ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासात दोन अपघात ; 8 जण जखमी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासात दोन अपघात ; 8 जण जखमी

पिंपरी। (PNE)- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान दोन अपघात झाले. यामध्ये आठ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे महामार्गाच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मुंबई लेनवर पुण्याकडून मुंबईकडे जाणारा भरधाव महिंद्रा पिकअप टेम्पो टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व टेम्पो उलटून झालेल्या अपघातात तीन  महिला, तीन लहान मुले व एक पुरुष असे सात जण जखमी झाले आहेत.

दुस-या अपघातात ट्रेलरला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. यात ट्रेलर चालक जखमी झाला आहे. हा अपघात लोणावळा हद्दीत झाला. या आठही जणांवर लोणावळा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *