ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / काशीद येथील समुद्रात बुडून पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू

काशीद येथील समुद्रात बुडून पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू

पुणे। (PNE)- काशीद येथे समुद्रपर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुस-याचा शोध सुरू आहे. ही घटना रविवार (29 ऑक्टोबर) रोजी घडली. मयतांमध्ये अक्षय भोसले (रा. औरंगाबाद) आणि अमोल नाझरे (रा. पुणे) यांचा समावेश आहे. यातील अक्षय भोसले याचा मृतदेह सापडला आहे.

पुण्यातील महाविद्यालयातील तीन तरूण आणि तीन तरुणी काशीद येथील समुद्र किनारी पर्यटनासाठी आले होते. यावेळी समुद्रात उतरलेल्या या तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते लाटांमध्ये सापडले. यावेळी समुद्रकिनारी तैनात असणा-या जीवरक्षकांनी चौघांना पाण्याबाहेर काढले तर दोघे बुडाले.

Check Also

महाराष्ट्र भाजपा के 23 प्रत्याशियों का ऐलान,5 सांसदों का पत्ता कटा

मुंबई-महाराष्ट्र में 19 अप्रैल से 20 मई तक पांच चरणों में लोकसभा चुनाव होंगे। बीजेपी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *