ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / राज ठाकरेंचा ‘डीएनए’ उत्तर भारतीय; डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची डोंबिवलीत टीका

राज ठाकरेंचा ‘डीएनए’ उत्तर भारतीय; डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची डोंबिवलीत टीका

ठाणे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर प्रदेशातील आहेत, कारण त्यांचा आणि उत्तर भारतीयांचा डीएनए सारखाच आहे,’ असे वक्तव्य भाजपचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी डोंबिवली येथे केले. स्वामी यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल हे विधान केल्याचे कळल्यावर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी तिथे धाव घेत, या वक्तव्याचा जाब विचारला. कार्यक्रमस्थळी प्रचंड बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार तिथे घडला नाही.
भाजपचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे ‘भारत उभरते जागतिक नेतृत्व, एक पाउल रामराज्याकडे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टद्वारे आणि विराट हिंदू संगम यांनी संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी डोंबिवलीकरांना मार्गदर्शन केले. रामाचा जन्म जिथे झाला त्याच जागी कोणाही हिंदू भक्ताला ईश्वरप्रार्थना करण्याचा भारतीय राज्यघटनेनुसार अधिकार आहे आणि म्हणूनच आयोध्येतच, त्याच जागी मंदिर होईल, याबाबत तीळमात्र शंका नाही, असेही ते म्हणाले. मुस्लिम बांधवांसाठी आम्ही आदरपूर्वक अन्य ठिकाणी प्रार्थनास्थळांसाठी जागा नक्की मिळवून देऊ,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. काश्मीरमधील वादग्रस्त कलम ३७० रद्द करण्यावर सरकार ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोटरीचे अध्यक्ष दीपक काळे,वि. हिं. संगमचे जगदीश शेट्टी, सुधीर जोगळेकर हे मान्यवरही या प्रसंगी उपस्थित होते.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *