ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / महंमदवाडी चौकात गादी कारखान्याला भीषण आग

महंमदवाडी चौकात गादी कारखान्याला भीषण आग

पुणे। (PNE)- हडपसर येथील महंमदवाडी चौकातील एका गादी कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.  घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन फायरगाड्या आणि खाजगी टँकर दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीत संपूर्ण गादी कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. परंतू नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळाली नाही.
 सुरुवातीला काही नागरिकांना या कारखान्यातून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी लगेच याची माहिती अग्मिशामक दलाला दिली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी येईपर्यंत आग चांगलीच भडकली होती. अग्निशामक दलाच्या दोन फायर गाड्या आणि पाण्याच्या दोन टँकरच्या साह्याने आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशाने लागली हे अद्याप समोर आले नाही. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

Check Also

महाराष्ट्र भाजपा के 23 प्रत्याशियों का ऐलान,5 सांसदों का पत्ता कटा

मुंबई-महाराष्ट्र में 19 अप्रैल से 20 मई तक पांच चरणों में लोकसभा चुनाव होंगे। बीजेपी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *