ताज़ा खबरे
Home / पुणे (page 214)

पुणे

मेट्रो प्रकल्पाला सर्वोतोपरी मदत करू – जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेला मेट्रो प्रकल्प हा पुणे शहराबरोबरच राज्यासाठी देखील महत्त्वाचा प्रकल्प असून तो पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे काम करीत महामेट्रोला सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिले. महामेट्रोच्या घोले रस्त्यावरील महात्मा फुले संग्रहालयातील प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते आज (शनिवार) …

Read More »

छायाचित्रकारांना एकत्र आणणा-या पिक्सलेन्ट या संकेतस्थळाची सुरुवात

पुणे : जागतिक छायाचित्रदिनाचे औचित्य साधून छायाचित्रण छंद म्हणून जोपासलेल्या अथवा व्यवसाय म्हणून स्वीकारलेल्या सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी पिक्सलेन्ट या भारतातील पहिल्या संकेतस्थळाची सुरुवात पुण्यात करण्यात आली. या संकेतस्थळामुळे छायाचित्रण कलेमध्ये जास्तीत जास्त आकर्षकता आणि सफाई आणण्याबरोबरच प्रख्यात छायाचित्रकारांकडून या विषयी मार्गदर्शन मिळवण्याची संधी सहज शक्य झाली आहे. पुण्यातील डॉ. …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश विलंबाविरोधात शिवसेनेचे आंदोलन

पुणे: पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळातील विद्यार्थ्यांना महापालिकेकडून गणवेश पुरवण्यात येतात. मात्र, शाळा सुरू होऊन दोन महिने उलटून देखील अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात आले नाही. या विरोधात आज झालेल्या मुख्यसभेत शिवसेनेने आंदोलन केले. पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पुरवण्याची जबाबदारी  महापलिका प्रशासनाची असून त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे …

Read More »

पासदरवाढी विरोधात आबा बागुल यांचा भीक मागो आंदोलनाचा इशारा

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने देण्यात येणाऱ्या विविध पासेच्या किंमती मध्ये येत्या 21 तारखे पासून वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा पीएमपी प्रशासनातर्फे बुधवारी करण्यात आली आहे. ही दरवाढ मागे घेण्यात  यावी अन्यथा या विरोधात भिक मागो आंदोलन करण्याचा इशारा माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिला आहे. एकीकडे देशात, …

Read More »

स्वस्त, दर्जेदार इनोव्हेशनसाठी शिक्षणसंस्थांनी पुढाकार घ्यावा – डॉ. रघुनाथ माशेलकर

पुणे : “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता ठासून भरलेली आहे. त्यांच्यातील या बुद्धिमतेला चालना दिली, तर मोठ्या प्रमाणात नवनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे शिक्षणसंस्थांनी स्वस्त आणि दर्जेदार इनोव्हेशनसाठी पुढाकार घेतला पाहिजे. केजे शिक्षणसंस्थेने संशोधन आणि नवनिर्मितीला चालना देत सकारात्मक पाऊल टाकले आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी …

Read More »

जावेला मुलगा झाल्याच्या इर्षेतून चिमुकलीला आईनेच नदीत फेकले!

पुणे : बोपोडी येथे भरदिवसा माझे बाळ माझ्यापासून हिसकावून नेले असा बनाव करणा-या महिलेनेच आपले दहा दिवसाचे बाळ केवळ इर्षेपोटी नदी पात्रात फेकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तिचा हा बनाव खडकी पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून उघडकीस आणला. रेश्मा रियासत शेख (वय. 20 रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) असे आरोपी …

Read More »

शरद मोहोळ टोळीतील सराईत गुंडासह सात जणांना हिंजवडीमधून अटक

पुणे: दरोड्याचा तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने हिंजवडीमधून परिसरातून अटक केली. अटक केलेल्यांमध्ये कुख्यात शरद मोहोळ टोळीतील सराईत गुन्हेगार उमेश वाघोलीकर याचा समावेश आहे. आरोपींकडून 5 पिस्तुल, 23 जिवंत काडतुसे, 2 कार, मोटारसायकली आणि घातक हत्त्यारे जप्त केली आहेत. एका उच्चपदस्थ व्यक्तीच्या खुनाची सुपारी घेतल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाल्याचे …

Read More »

जलयुक्त शिवार योजनेने देशाला आदर्श दिला- मुख्यमंत्री फडणवीस

पुणे: ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनता उत्साहाने काम करीत आहे. या उत्साहाला संस्थात्मक रूप देऊन राज्य दुष्काळमुक्त करू. नद्या पुनरूज्जिवीत कराव्यात आणि गावे स्वावलंबी करण्याचे उद्दीष्ट ठेवावे. ‘जलसाक्षरता केंद्र‘ ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाला ‘ आयडियल मॉडेल’ दिले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्याचा जलसंपदा विभाग आणि ‘यशदा’च्या …

Read More »

वर्दळीच्या रस्त्यांवर पालिकेचे वॉकिंग प्लाझाचे नियोजन

पुणे: पुणे शहरातील महत्त्वाच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने मोठी वर्दळ असलेल्या  रस्त्यावर ‘वॉकिंग प्लाझा’ संकल्पना राबवण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. पादचाऱ्यांना पदपथाचा (फूटपाथ) चांगल्या प्रकारे वापर करता यावा, यासाठी लक्ष्मी रस्त्यावर ‘वॉकिंग प्लाझा’चे नियोजन पालिकेने सुरू केले आहे. लक्ष्मी रस्ता हा शहरातील महत्त्वाचा रस्ता आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातूनही या रस्त्याला …

Read More »

पुण्यात लवकरच स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी

पुणे: पुणे महापालिकेतर्फे शहरात लवकरच स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या सहा प्रमुख अधिकार्‍यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या वतीने शहरात स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या 2017-18 च्या अंदाजपत्रकात 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली …

Read More »