ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / पासदरवाढी विरोधात आबा बागुल यांचा भीक मागो आंदोलनाचा इशारा

पासदरवाढी विरोधात आबा बागुल यांचा भीक मागो आंदोलनाचा इशारा

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने देण्यात येणाऱ्या विविध पासेच्या किंमती मध्ये येत्या 21 तारखे पासून वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा पीएमपी प्रशासनातर्फे बुधवारी करण्यात आली आहे. ही दरवाढ मागे घेण्यात  यावी अन्यथा या विरोधात भिक मागो आंदोलन करण्याचा इशारा माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिला आहे.
एकीकडे देशात, राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देण्यासाठी धोरण राबविण्यात येत आहे. मात्र पुण्यात मात्र या धोरणाची पायमल्ली करून ज्येष्ठ नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार भाजप करत असल्याचा आरोप बागुल यांनी केला आहे.

शहराची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पास दर वाढीचा निर्णय घेताना ज्येष्ठ नागरिकांना पीएमपी  प्रवास दिलासादायक करण्याऐवजी उतारवयात त्यांच्यावर पाससाठी जादा दर लादून सत्ताधारी भाजपने ‘बुरे दिन ‘ चा दाखला दिला आहे. एकीकडे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करताना ज्येष्ठ नागरिकांना मात्र पीएमपीएल  प्रवासासाठी पासमध्ये आणखी सवलत देण्याऐवजी दर वाढविण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे आबा बागुल यांनी म्हटले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांवर पासदर वाढ होऊ देणार नाही वेळ पडली तर रस्त्यावर उतरून विरोध करताना भीक मागो आंदोलन केले जाईल असा इशाराही आबा बागुल यांनी दिला आहे. यासंदर्भांत  ,मुख्यमंत्री , पालकमंत्री यांच्याकडेही दाद मागण्यात येणार असल्याची त्यांनी निवेदनात म्हटले  आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *