ताज़ा खबरे
Home / पुणे / शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश विलंबाविरोधात शिवसेनेचे आंदोलन

शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश विलंबाविरोधात शिवसेनेचे आंदोलन

पुणे: पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळातील विद्यार्थ्यांना महापालिकेकडून गणवेश पुरवण्यात येतात. मात्र, शाळा सुरू होऊन दोन महिने उलटून देखील अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात आले नाही. या विरोधात आज झालेल्या मुख्यसभेत शिवसेनेने आंदोलन केले.

पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पुरवण्याची जबाबदारी  महापलिका प्रशासनाची असून त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. 15 ऑगस्टपूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात येतील, असे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र स्वातंत्र्यादिना दिवशी देखील बर्‍याच विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षीचे गणवेश घेतले होते. तर काही विद्यार्थ्यांनी गणवेशाविनाच होते. या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच लवकरात लवकर विद्यार्थ्यांना  गणवेश देण्याची मागणी करण्यात आली.

Check Also

पुणे में सीबीआई ने मणिपुर हत्याकांड के मास्टरमाइंड को दबोचा

पुणे- मणिपुर में पिछले कुछ महीनों से हिंसा जारी है। दो बच्चों का अपहरण कर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *