ताज़ा खबरे
Home / पुणे (page 213)

पुणे

अन्नसुरक्षा हिच जीवन सुरक्षा हे ध्येय हॉटेल व्यावसायिकांनी बाळगावे- पालकमंत्री

पुणे- पुणे विभागातील हॉटेल व्यावसायिकानी त्यांच्या व्यवसायाची वृध्दी करताना अन्न सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आज अन्न व औषधे प्रशासनाच्या वतीने अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम 2006 अंतर्गत सुरक्षित अन्नपदार्थ उत्पादन,साठवण,हाताळणी व विक्रीबाबत हॉटेल,रेस्टॉरन्ट,केटरर्स …

Read More »

महापालिकेच्या मिळकती भाडेतत्वावर देण्यासाठी ‘ई-लिलाव’

पिंपरी- पुणे महापालिकेच्या मालकीच्या मिळकती भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेतील राजकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेप रोखण्याच्या उद्देशाने महापालिकेने पावले उचलण्यास सुरवात केली असून या मिळकतीचा ‘ई-लिलाव’ करण्यात येणार आहे पुणे शहरात महापालिकेच्या मिळकतींची संख्या मोठी असून, त्यात व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या मिळकतींचे प्रमाण अधिक आहे. प्रचलित नियमावलीनुसार ठराविक मुदतीसाठी त्या भाडेतत्त्वावर देण्यात येतात. …

Read More »

पाऊस जाताच पुण्यात थंडीची चाहुल; तापमान १५.१ वर!

पुणे: परतीच्या पावसाचा राज्यातील मुक्काम संपल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले अन् दुसऱ्याच दिवशी पुणेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव मिळाला. गेल्या दोन दिवसात शहराच्या कमाल तापमानात मोठी घट झाली असून रात्री उशिरा आणि पहाटे हवेत गारवा जाणवतो आहे. शहरात बुधवारी दिवसभरात १५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. या हंगामातील शहरातील …

Read More »

प्रायोगिक बदल गुंडाळला, विद्यापीठ चौकातील वाहतूक प्रश्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूककोंडी हा विषय वाहनचालकांसाठी नेहमीच डोकेदुखीचा बनला आहे. ही चौकातील कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने वाहतूक विभागाच्या सहकार्याने वाहतूक व्यवस्थेत बदल केला खरा; मात्र या बदलामुळे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था झाल्याने एका दिवसातच हा प्रायोगिक तत्वावर राबविलेला बदल महापालिकेसह वाहतूक विभागाला बासनात …

Read More »

अंगणवाडी कर्मचा-यांचं जेलभरो आंदोलन, सरकारविरोधात नोंदवला निषेध

पुणे – अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणा-या महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीच्या वतीने गुरुवारी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात एकाच वेळी 5 ठिकाणी रास्ता रोको  करुन जेलभरो आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी कर्मचारी सभेचे उपाध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट येथील जेधे चौकात सकाळी आंदोलनास …

Read More »

भटक्या कुत्र्यांना जिवंत जाळले; बाणेर वस्तीमध्ये धक्कादायक प्रकार!

पुणे: भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो म्हणून महापालिकेकडे दाद मागण्याऐवजी काही लोकांनी कुत्र्यांना जिवंत जाळल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बाणेर वस्तीमध्ये हा प्रकार घडला असून, चार कुत्र्यांना जाळून तर १६ कुत्र्यांना विष पाजून ठार मारण्यात आले आहे. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत चतुश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ’अॅक्शन …

Read More »

योग्य व्यक्तींचा सन्मान होत नाही;विश्वनाथ प्रसाद तिवारी यांची खंत

पुणे : ‘ज्या समाजात योग्य व्यक्तीचा सन्मान होत नाही, तो समाज गडबडलेला असतो. आपण ज्यांचा सन्मान करायला नको अशांचा करतो आणि ज्यांचा केला पाहिजे त्यांचा करत नाही. ही आपल्याकडील पद्धत आहे,’ या शब्दांत साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी बुधवारी देशातील पुरस्कार संस्कृतीवर ताशेरे ओढले. ‘ज्या भाषांनी भारताला घडवले, त्यासाठी …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचं पुण्यात निधन

पुणे। आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून महानगरीय उद्यमशील संस्कृतीचं दर्शन घडवणारे, त्यावर उपरोधिक शैलीत भाष्य करणारे प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेलं आणि प्रेक्षक-समीक्षकांची दाद मिळवलेलं ‘दोन स्पेशल’ …

Read More »

‘वाडिया’च्या संस्थेत वर्चस्वासाठी लढाई; कार्यकारिणी रद्द करण्याची मागणी

पुणे : पुण्यातील वाडिया आणि मुंबईतील रूपारेल या महाविद्यालयाचे संचलन करणाऱ्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीवर वर्चस्व मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. शिक्षक आणि माजी शिक्षक यांद्वारे गेली नव्वद वर्षे उत्तम संचलन होत असलेल्या या संस्थेची कार्यकारिणी रद्द करण्याची मागणी, या संस्थेच्या स्थापनेच्या वेळेस आर्थिक मदत देणाऱ्या वाडिया कुटुंबाने सहधर्मादाय आयुक्तांकडे …

Read More »

कर्जमाफी रक्कम महिलांच्या खात्यात; राज्य सरकारचा निर्णय

पुणे: राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी जाहीर केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनें’तर्गत शेतकऱ्यांना मिळणारी दीड लाख रुपयांपर्यंतची थकबाकी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जाणारी २५ हजार रुपयांची रक्कम कुटुंबप्रमुख म्हणून महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या योजनेत २२ सप्टेंबरपर्यंत ५६ लाख …

Read More »