ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / महापालिकेच्या मिळकती भाडेतत्वावर देण्यासाठी ‘ई-लिलाव’

महापालिकेच्या मिळकती भाडेतत्वावर देण्यासाठी ‘ई-लिलाव’

पिंपरी- पुणे महापालिकेच्या मालकीच्या मिळकती भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेतील राजकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेप रोखण्याच्या उद्देशाने महापालिकेने पावले उचलण्यास सुरवात केली असून या मिळकतीचा ‘ई-लिलाव’ करण्यात येणार आहे

पुणे शहरात महापालिकेच्या मिळकतींची संख्या मोठी असून, त्यात व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या मिळकतींचे प्रमाण अधिक आहे. प्रचलित नियमावलीनुसार ठराविक मुदतीसाठी त्या भाडेतत्त्वावर देण्यात येतात. कमीत कमी भाडे देऊन या मिळकती ताब्यात घेण्याचे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील बहुतांशी भाडेकरू महिन्याकाठचे भाडेही वेळेत भरत नसल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे महापालिकेच्या मिळकतींच्या थकबाकीचा आकडा मोठा आहे. ती वसूल करण्याच्या पातळ्यांवर कोणतेही प्रयत्न होत नाहीत. त्यातच, विविध राजकीय पक्षांचे नेते आपापल्या भागातील मिळकती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याही कवडीमोलाने (भाडेतत्त्वावर) घेण्यात येत असल्याचे दिसून आले. महापालिकेच्या इमारतींमधील दुकाने कमी भाडे घेऊन देण्यासाठी प्रशासनातील काही अधिकारीही प्रयत्न करीत असतात. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर मिळकतींसाठी पुरेसे भाडे मिळावे आणि त्यातून अपेक्षित उत्पन्न वाढविण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने लिलाव करून मिळकती भाडेतत्त्वावर देण्याचे नियोजन आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *