ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / पाऊस जाताच पुण्यात थंडीची चाहुल; तापमान १५.१ वर!

पाऊस जाताच पुण्यात थंडीची चाहुल; तापमान १५.१ वर!

पुणे: परतीच्या पावसाचा राज्यातील मुक्काम संपल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले अन् दुसऱ्याच दिवशी पुणेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव मिळाला. गेल्या दोन दिवसात शहराच्या कमाल तापमानात मोठी घट झाली असून रात्री उशिरा आणि पहाटे हवेत गारवा जाणवतो आहे. शहरात बुधवारी दिवसभरात १५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. या हंगामातील शहरातील सर्वात कमी तापमान नोंदविण्यात आले.
पावसाळा संपला की महिनाभर ऑक्टोबर हिटचा सामाना केल्यानंतर थंडी सुरूवात होते. पण यंदा पावसाने दिवाळीच्या पूर्वसंध्येपर्यंत शहरात धुमाकूळ घातला होता. गेल्या आठवड्यापर्यंत नागरिक दिवसा उकाडा आणि संध्याकाळी मुसळधार पावसाचा सामना करीत होते. दिवाळीवरही पावसाचे सावट होते, मात्र दिवाळीतील दोन दिवस तापमानात अचानक घट होऊन हवेत गारवा आला. भाऊबीजेला पावसाने पुन्हा हजेरी लावली. गेल्या दोन दिवसात शहरातील वातावरण बदलले आहे.
शहरात सोमवारी किमान तापमान २० अंशापेक्षा अधिक होते. त्यात मंगळवारी तीन अंशाने घट होऊन १८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि संध्याकाळी हवेत गारवा वाढला होता. फिरायला जाणाऱ्या लोकांनी स्वेटर बाहेर काढल्याचे बघायला मिळाले.बुधवारी सकाळी हुडहुडी भरण्याऐवढी थंडी अनुभवायला मिळाली, दिवसभरात तापमानात ३ पेक्षा जास्त अंशाने घट होऊन किमान तापमान १५.१ अंश नोंदविण्यात आले. पुढील काही दिवसांत किमान तापमानात अजून घट होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *