ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / कर्जमाफी रक्कम महिलांच्या खात्यात; राज्य सरकारचा निर्णय

कर्जमाफी रक्कम महिलांच्या खात्यात; राज्य सरकारचा निर्णय

पुणे: राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी जाहीर केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनें’तर्गत शेतकऱ्यांना मिळणारी दीड लाख रुपयांपर्यंतची थकबाकी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जाणारी २५ हजार रुपयांची रक्कम कुटुंबप्रमुख म्हणून महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या या योजनेत २२ सप्टेंबरपर्यंत ५६ लाख ५९ हजार १८७ अर्ज भरण्यात आले. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून दोन लाख ९८ हजार ५६ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अर्ज करण्यात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अर्जांची छाननी झाल्यानंतर दीड लाख रुपये कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांच्या खात्यात २५ हजार रुपये जमा होणार आहेत. मात्र, ही रक्कम कुटुंबप्रमुख म्हणून महिलांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.
कुटुंबात महिला नसल्यास संबंधित पुरुषाच्या खात्यात रक्कम जमा होईल. मात्र, अन्य कुटुंबांमध्ये महिलांच्याच खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार असल्याचे सहकार विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी इंदापूर तालुक्यातून सर्वाधिक ३४,७८७ अर्ज आले आहेत. वेल्हा तालुक्यात सर्वांत कमी चार हजार २०९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिरूर तालुका हा दुसऱ्या क्रमांकावर असून, तालुक्यातून ३४ हजार ३८८ अर्ज आले आहेत. बारामती तालुका तिसऱ्या क्रमांकावर आहे. या तालुक्यातील ३३ हजार ७७६ शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत.
‘विना आधार’ २४ हजार ९९५ अर्ज
‘जिल्ह्यातून आलेल्या एकूण अर्जांपैकी २४,९९५ शेतकऱ्यांचे अर्ज विना आधार आहेत. या अर्जांची छाननी स्वतंत्रपणे केली जाणार आहे,’ असे सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी सांगितले. आधार कार्डची जोडणी असल्यास संबंधित लाभधारकाची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे. आधारकार्डमुळे दुबार नावांची शक्यता नसून, योग्य व्यक्तींनाच या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे,’ असे कटके यांनी स्पष्ट केले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *