ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / अंगणवाडी कर्मचा-यांचं जेलभरो आंदोलन, सरकारविरोधात नोंदवला निषेध

अंगणवाडी कर्मचा-यांचं जेलभरो आंदोलन, सरकारविरोधात नोंदवला निषेध

पुणे – अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणा-या महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीच्या वतीने गुरुवारी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात एकाच वेळी 5 ठिकाणी रास्ता रोको  करुन जेलभरो आंदोलन करण्यात आले.

अंगणवाडी कर्मचारी सभेचे उपाध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट येथील जेधे चौकात सकाळी आंदोलनास सुरुवात झाली. अंगणवाडी सेविकांनी सुरुवातीला रस्त्याच्या शेजारी उभे राहून घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण जेधे चौकात रस्त्यावर बैठक मारली. काही वेळ रास्ता अडवल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन स्वारगेट पोलीस ठाण्यात नेले. हडपसर गाडी तळ, पुणे -मुंबई रोडवरील नाशिक फाटा, जुना बाजार, कर्वे रोडवरील शिवाजी पुतळा येथेही आंदोलन करण्यात आले.

‘अंगणवाडी ताईं’चा जेलभरो
मानधनवाढ, पोषण आहाराच्या दर्जात सुधारणा या प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.  शिवसेनेसह प्रमुख पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे बळ वाढले असल्याचा दावा समितीने केला आहे. त्यामुळे सीएसएमटी येथे अटक करून घेत ‘अंगणवाडी ताई’ आपली ताकद दाखवत आहेत.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *