ताज़ा खबरे

स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आयुक्त हर्डीकर

पिंपरी: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व स्मार्ट सिटीचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी पालिका मुख्यालयात शुक्रवारी …

Read More »

जुनी सांगवीतील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम वेगात करा – प्रशांत शितोळे

पिंपरी: जुनी सांगवीतील पवनानदी घाटाजवळील स्मशानभूमीचे काम सध्या संथगतीने होत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकाना अंत्यविधी व इतर धार्मिक विधी करण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीचे काम वेगात करण्याची मागणी स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश विलंबाविरोधात शिवसेनेचे आंदोलन

पुणे: पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळातील विद्यार्थ्यांना महापालिकेकडून गणवेश पुरवण्यात येतात. मात्र, शाळा सुरू होऊन दोन महिने उलटून देखील अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात आले नाही. या विरोधात आज झालेल्या मुख्यसभेत शिवसेनेने आंदोलन केले. पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पुरवण्याची जबाबदारी  महापलिका प्रशासनाची असून त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे …

Read More »

स्मार्ट सिटीची पहिली सभा अवघ्या 25 मिनिटात गुंडाळली!

पिंपरी: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनीच्या नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली सभा (शुक्रवारी पार पडली. ही सभा अवघ्या 25 मिनिटात गुंडाळण्यात आली. बैठकीचे केवळ  सोपस्कार पार पडले. या बैठकीत कंपनी स्थापनेसह विविध 20 विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन …

Read More »

नितीश कुमार अखेर मोदींच्या छत्रछायेत; जेडीयु NDAमध्ये!

नवी दिल्ली: धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अवघ्या चार वर्षांतच मोदींच्या छत्रछायेखाली आले आहेत. नितीश यांच्या संयुक्त जनता दलानं भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज या संदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय जनता दल …

Read More »

मुंबई, ठाण्यात मुसळधार; रायगडलाही झोडपले!

मुंबई/ठाणे : मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत असून मुंबई, ठाण्यासह रायगड व विदर्भाला आज पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाण्यातील पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. तर, विदर्भात बरसणाऱ्या पावसानं तिथलं दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकलं आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात आज सकाळपासून पावसानं जोरदार बॅटिंग केली. …

Read More »

‘वंदे मातरम्’वरून औरंगाबाद महापालिकेत राडा

औरंगाबाद : ‘वंदे मातरम्’वरून सध्या देशात सुरू असलेल्या गदारोळाचे तीव्र पडसाद आज औरंगाबाद महापालिकेत उमटले. ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना-भाजप व एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये तुंबळ घोषणाबाजी झाली. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीनंतर सेना-एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्कीही झाली. सभागृहातील माइक, पंख्यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी तीन नगरसेवकांना निलंबित करण्यात आलं आहे. औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधार सभेला …

Read More »

सिनेरिव्ह्यू: बरेली की बर्फी सिनेरिव्ह्यू

प्रेम ही भावना अलगदपणे उलगडणारी असते. काही वेळा तिची जाणीव एखाद्या धडाक्याने होत असली, तरी उलगडणे हळूवारच असते. त्यामुळे अशी एखादी प्रेमकथा मांडताना तिचा उलगडा हलक्या हाताने व्हायला हवा. तसे न झाल्यास, गोष्ट फसते. ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक अश्विनी अय्यर-तिवारी यांना ही नीरगाठ उकलणे जमले आहे. अगदी साधी …

Read More »

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा होणार विस्तार!

मुंबई : केंद्र सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर महिनाभरात राज्य मंत्रिमंडळाचाही विस्तार करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा विस्तार ठरणार असून लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लावायची, यासाठी पक्षश्रेष्ठींकडून चाचपणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुका २०१९ …

Read More »

‘सिक्का’ प्रकरणामुळे ‘इन्फोसिस’ गुंतवणुकदारांना ३१ हजार कोटींचा फटका!

बेंगळुरू : सॉफ्टवेअर उद्योगातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी असणाऱ्या ‘इन्फोसिस’चे सीईओ विशाल सिक्का यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने गुंतवणूकदारांचे ३१ हजार ४१८ कोटी रुपये मातीमोल झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिक्कांच्या निर्णयामुळे कंपनीच्या शेअरमध्ये १३.३९ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि …

Read More »