ताज़ा खबरे
Home / पिंपरी / चिंचवड / जुनी सांगवीतील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम वेगात करा – प्रशांत शितोळे

जुनी सांगवीतील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम वेगात करा – प्रशांत शितोळे

पिंपरी: जुनी सांगवीतील पवनानदी घाटाजवळील स्मशानभूमीचे काम सध्या संथगतीने होत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकाना अंत्यविधी व इतर धार्मिक विधी करण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीचे काम वेगात करण्याची मागणी स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, स्मशानभूमीचे संथ गतीने सुरू असलेले काम वेगात पूर्ण करून गॅस शवदाहिनीची परिस्थिती सुधारण्यात यावी. पिंपरी-चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथील ही पहिली पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी आहे.

निवडणुकीपूर्वी केवळ सत्तेसाठी आरोप करत या शवदाहीनीचे राजकारण करण्यात आले. मात्र सत्ताबदलानंतरही सत्ताधारी मंडळी व पालिका प्रशासनाने येथील गैरसोयी बाबत आजवर कुठलीही सक्षम उपाययोजना केली नाही. ही शवदाहीनी महिना महिना बंद ठेवण्यात येत आहे, असे शितोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Check Also

चाकण से युवक का अपहरण…हत्या…चाकण पुलिस हत्यारे को दवोचा

पिंपरी- 18 वर्षीय लड़के आदित्य युवराज भंगारे का मार्च में महालुंगे पुलिस स्टेशन क्षेत्र से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *