ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / नितीश कुमार अखेर मोदींच्या छत्रछायेत; जेडीयु NDAमध्ये!

नितीश कुमार अखेर मोदींच्या छत्रछायेत; जेडीयु NDAमध्ये!

नवी दिल्ली: धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अवघ्या चार वर्षांतच मोदींच्या छत्रछायेखाली आले आहेत. नितीश यांच्या संयुक्त जनता दलानं भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज या संदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला.
राष्ट्रीय जनता दल व काँग्रेससोबतच्या महाआघाडीतून बाहेर पडून बिहारमध्ये भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी नितीश यांना एनडीएत सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं. नितीश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हे आमंत्रण औपचारिकरित्या स्वीकारण्यात आलं. तत्पूर्वी, बिहारमधील महाआघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर औपचारिक शिक्कामोर्तबही करण्यात आलं.
यादव समर्थकांचा धिंगाणा
भाजपसोबत जाण्याच्या नितीश कुमार यांच्या निर्णयानंतर बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या शरद यादव यांच्या समर्थकांनी आज नितीश यांच्या घराबाहेर घोषणाबाजी करत गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं. माझ्या नेतृत्वाखालील गट हाच खरा संयुक्त जनता दल असल्याचा शरद यादव यांचा दावा आहे. त्यांनी आज पाटण्यात आपल्या समर्थकांची बैठकही बोलावली असून काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाशी महाआघाडी कायम असल्याचा ठराव तिथं करण्यात येणार आहे. मात्र, या बैठकीशी संयुक्त जनता दलाचा काहीएक संबंध नाही, असं जेडीयू नेते के. सी. त्यागी यांनी स्पष्ट केलं आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *