ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ‘सिक्का’ प्रकरणामुळे ‘इन्फोसिस’ गुंतवणुकदारांना ३१ हजार कोटींचा फटका!

‘सिक्का’ प्रकरणामुळे ‘इन्फोसिस’ गुंतवणुकदारांना ३१ हजार कोटींचा फटका!

बेंगळुरू : सॉफ्टवेअर उद्योगातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी असणाऱ्या ‘इन्फोसिस’चे सीईओ विशाल सिक्का यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने गुंतवणूकदारांचे ३१ हजार ४१८ कोटी रुपये मातीमोल झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिक्कांच्या निर्णयामुळे कंपनीच्या शेअरमध्ये १३.३९ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.
इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ विशाल सिक्का (वय ५०) यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. त्यानंतर चर्चांना ऊत आला आहे. त्यातच इन्फोसिसच्या बोर्डाने सिक्का यांची बाजू घेतल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कंपनीत सकारात्मक बदल घडून येण्यासाठी सिक्का कारणीभूत असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. सिक्का यांच्यामुळे कंपनीला भविष्यात आपले लक्ष्य गाठण्यात यश येईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. कंपनीचे संस्थापक नारायणमूर्ती यांचे नाव न घेताही बोर्डाने त्यांच्यावर टीका केली आहे.
बोर्डाचे चेअरमन आर. शेषसाई म्हणाले की, इन्फोसिसच्या स्थित्यंतरामध्ये सिक्का यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी कंपनीला नवी दिशा आणि ऊर्जा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. सॉफ्टवेअर उद्योग आणि कंपनीच्या भविष्यासाठी त्यांची दूरदृष्टी महत्त्वाची ठरणार आहे. शेषसाई यांच्या वक्तव्यानंतर काही वेळाने ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायणमूर्ती यांनी प्रतिक्रिया नोंदवली. ‘इन्फोसिस बोर्डाच्या दृष्टिकोनामुळे मला धक्का बसला आहे. त्यांनी केलेले आरोप, नोंदवलेली प्रतिक्रिया आणि त्यातील भावनांमुळे मी दुखावलो गेलो आहे. अशाप्रकारे करण्यात आलेल्या व्यक्तिगत आरोपांना उत्तरे देण्यापेक्षात ते प्रकार टाळण्यावर माझा भर राहील,’ असे नारायणमूर्ती यांनी म्हटले आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *