ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ‘वंदे मातरम्’वरून औरंगाबाद महापालिकेत राडा

‘वंदे मातरम्’वरून औरंगाबाद महापालिकेत राडा

औरंगाबाद : ‘वंदे मातरम्’वरून सध्या देशात सुरू असलेल्या गदारोळाचे तीव्र पडसाद आज औरंगाबाद महापालिकेत उमटले. ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना-भाजप व एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये तुंबळ घोषणाबाजी झाली. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीनंतर सेना-एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्कीही झाली. सभागृहातील माइक, पंख्यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी तीन नगरसेवकांना निलंबित करण्यात आलं आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधार सभेला आज ‘वंदे मातरम्’नं सुरुवात झाली. ‘वंदे मातरम्’ सुरू असताना विरोधी बाकावरचे एमआयएम व काँग्रेसचे नगरसेवक बसून होते. युतीच्या नगरसेवकांनी त्यास जोरदार आक्षेप घेत ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. काही नगरसेवकांनी महापौरांसमोरच्या हौद्यात येऊन घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळं संतापलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांनीही महापौरांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. गदारोळ वाढत चालल्याचं पाहून महापौरांनी कामकाज तहकूब केला.
कामकाज तहकूब झालं असताना युतीच्या काही नगरसेवकांनी भगव्या शाली फडकवल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून एमआयएमच्या नगरसेवकांनी बाकांवरील माइक उपसून काढले आणि पंख्यांची तोडफोड केली. या प्रकरणी दोन नगरसेवकांना निलंबित करण्यात आलं आहे. या गोंधळाप्रकरणी एमआयएमचे सय्यद मतीन, शेख जफर व काँग्रेसचे सोहेल शेख यांच्यासह तिघांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *