ताज़ा खबरे
Home / Raftar News (page 316)

Raftar News

बिहारः तेजस्वी यादवांची ‘जनादेश अपमान यात्रा’

पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आजपासून महात्मा गांधी यांची कर्मभूमी चम्पारण येथून ‘जनादेश अपमान यात्रा’ सुरू करणार आहेत. तेजस्वी यादव यांची ही यात्रा यशस्वी व्हावी यासाठी त्यांची आई व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी तेजस्वी यांना टिळा लावून शुभेच्छा दिल्या. बिहारमधील जनतेने आरजेडी आणि जदयू या दोन पक्षांना …

Read More »

मराठा आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करा: रामदास आठवले

मुंबई: मराठा समाजाला नोकरी व शिक्षणामध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे, असे स्पष्ट करतानाच मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेल्या मुंबईतील मोर्चाला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी ही घोषणा केली. मराठा समाजासह देशातील गुर्जर, …

Read More »

भाजपला धक्का; गुजरातमधून अहमद पटेल राज्यसभेवर!

गांधीनगर : काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी विजय मिळवत राज्यसभेची जागा कायम राखली आहे. तर इतर दोन जागांवर अपेक्षेप्रमाणे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी विजय मिळवला आहे. पटेल यांच्या विजयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. …

Read More »

आशिष शेलार यांना धक्काबुक्की? विधानसभेत जा; मोर्चेकऱ्यांनी सुनावलं!

मुंबई :  मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेले भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना धक्काबुक्की झाल्याचं वृत्त आहे. मोर्चेकऱ्यांनी शेलार यांना आझाद मैदानात येण्यापासून अटकाव केला. विधानसभेत जाऊन तुमचं काम करा, असं त्यांना सुनावण्यात आलं. आरक्षण व कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा …

Read More »

तालिबान आणि इसिसने मिळून केली 50 नागरिकांची हत्या

काबुल– तालिबान आणि इस्लामिक स्टेट या दोन्ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांनी मिळून अफगाणिस्तानमधील गावांमध्ये शेकडो नागरिकांची हत्या केल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या दोन्ही दहशतवादी संघटनांनी मिळून प्रथमच अशाप्रकारे घातपाती कारवाया घडवल्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर त्यांना मोठे आव्हान उभे राहिले आहे. हल्लेखोरांनी अफगानिस्तानच्या उत्तरेकडील सरा-ए-पुल या अतिशय दुर्गम जिल्ह्यात सुमारे 50 पेक्षा …

Read More »

रशियाच्या कृतीला अमेरिका 1 सप्टेंबरपर्यंत उत्तर देणार

मनिला – रशियाने अमेरिकेच्या दुतावासातील शेकडो अधिकाऱ्यांना मायदेशी धाडले आहे. त्यांची ही कृती अमेरिकेला थेट आव्हान देणारीच कृती ठरली असून त्याला कशाप्रकारे उत्तर द्यायचे यावर 1 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती अमेरिकेचे विदेशमंत्री रेक्‍स तिलेरसन यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि रशियाच्या राजकीय संबंधात सध्या मोठा कडवटपणा आला आहे. …

Read More »

बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या बहीणीवर बलात्कार करण्याचा आदेश

राजाराम (पाकिस्तान) – पाकिस्तानातल्या ग्रामीण भागात जिरगा म्हणजेच ग्राम पंचांच्या मंडळाच्या अजब निर्णयाचा मोठाच धसका तेथील रहिवाशांनी घेतला आहे. हे पंच मंडळ बऱ्याचवेळा अमानवी निर्णय देत असल्याच्या अनेक घटना वारंवार घडत असून राजाराम गावातही या जिरगा मंडळाने असाच एक अघोरी निर्णय दिला आहे. एका इसमावर 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा …

Read More »

राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊंची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी

पुणे : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. संघटनेने नेमलेल्या चौकशी समितीने हा निर्णय जाहीर केला असून सरकारमध्ये राहायचे की नाही, याबाबत येत्या आठ दिवसांत संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे सदाभाऊ आणि खासदार राजू शेट्टी यांची गेल्या १३ वर्षांची दोस्ती …

Read More »

विरोधकांची एकजूट ही वांझोटी कल्पना : उमर अब्दुल्ला

श्रीनगर : भाजपला पर्याय म्हणून तिसरी आघाडी निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असतानाच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या प्रयत्नांची खिल्ली उडवली आहे. विरोधकांची एकजूट म्हणजे केवळ दंतकथा असून ती एक वांझोटी कल्पना आहे, अशी टीका करतानाच २०१९ मध्ये विरोधक स्वत:साठीच एकत्र येतील आणि भाजपला पुन्हा ५ वर्ष सत्तेची संधी …

Read More »

शाळांमध्ये योगा सक्तीची गरज नाही: SC

नवी दिल्ली : शाळांमध्ये योगा शिक्षण सक्तीचं करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ‘शाळांमध्ये काय शिकवावे आणि काय नाही हे सांगण्याचं काम आमचं नाही. आम्ही त्यावर कसे काय आदेश देऊ शकतो?’ असा सवाल करतानाच ‘अशा मुद्द्यांवर केंद्र सरकारनेच निर्णय घ्यावा’, असं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं. दिल्ली भाजपचे प्रवक्ते अश्विनी उपाध्याय …

Read More »