ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / बिहारः तेजस्वी यादवांची ‘जनादेश अपमान यात्रा’

बिहारः तेजस्वी यादवांची ‘जनादेश अपमान यात्रा’

पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आजपासून महात्मा गांधी यांची कर्मभूमी चम्पारण येथून ‘जनादेश अपमान यात्रा’ सुरू करणार आहेत. तेजस्वी यादव यांची ही यात्रा यशस्वी व्हावी यासाठी त्यांची आई व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी तेजस्वी यांना टिळा लावून शुभेच्छा दिल्या.
बिहारमधील जनतेने आरजेडी आणि जदयू या दोन पक्षांना सत्ता स्थापन करण्यासाठी जनादेश दिला होता. परंतु बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीशी फारकत घेऊन भाजपसोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली. बिहारमधील जनतेने दिलेला कौल नितीश कुमार यांनी नाकारून बिहारमधील जनतेचा अपमान केला आहे.
मोतीहारी येथील गांधी मैदानात जाऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तेजस्वी यादव हे या यात्रेला प्रारंभ करणार आहेत. त्यानंतर मझौलियाच्या जानकी देवी कन्या उच्च विद्यालयात सायंकाळी ५ वाजता सभेला संबोधित करणार आहेत. सभा आटोपल्यानंतर शिवहरसाठी रवाना होणार आहेत. गुरूवारी सकाळी शिवहर समाहरणालय मैदानावर आयोजित सभेला संबोधित करतील. दुपारी १२.३० वाजता सीतामढीकडे प्रयाण करतील. सीतामढी येथील गोयंका कॉलेज मैदानावर दुपारी १ वाजता सभेला संबोधित करतील.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *