ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / मराठा आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करा: रामदास आठवले

मराठा आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करा: रामदास आठवले

मुंबई: मराठा समाजाला नोकरी व शिक्षणामध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे, असे स्पष्ट करतानाच मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेल्या मुंबईतील मोर्चाला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला आहे.
या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी ही घोषणा केली. मराठा समाजासह देशातील गुर्जर, जाट, लिंगायत, ब्राह्मण आदी उच्चवर्णीय जातीतील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना संसदेत कायदा करून २५ टक्के आरक्षण देण्याची आपली जुनी मागणी आहे. त्यासाठी राज्यघटनेत दुरूस्ती करून आरक्षणाची मर्यादा ५० वरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढवावी, असे आवाहन आठवले यांनी केले. आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याचा संसदेत कायदा झाल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असेही ते म्हणाले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, भटके विमुक्त जातीजमाती प्रवर्गाच्या प्रचलित आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र श्रेणीत आरक्षण देण्यात यावे, अशी सूचना आठवले यांनी केली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *