ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / भाजपला धक्का; गुजरातमधून अहमद पटेल राज्यसभेवर!

भाजपला धक्का; गुजरातमधून अहमद पटेल राज्यसभेवर!

गांधीनगर : काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी विजय मिळवत राज्यसभेची जागा कायम राखली आहे. तर इतर दोन जागांवर अपेक्षेप्रमाणे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी विजय मिळवला आहे. पटेल यांच्या विजयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
अहमद पटेल यांना ४४ मते मिळाली. पटेल हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असून काँग्रेसमधील एक वजनदार नेतृत्व असल्याने भाजपने पटेल यांना या निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी मोठा जोर लावला होता. त्यात भाजपला यशही आले होते. मात्र, काँग्रेसच्या दोन आमदारांनी मतदानानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांना मतपत्रिका दाखवल्यानं या निवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले. शहा यांना मतपत्रिका दाखवणाऱ्या आमदारांची दोन मतं निवडणूक आयोगानं बाद ठरवली. भाजपनं काँग्रेसच्या बाजूनं लागलेल्या या निर्णयाला आवाहन दिल्यानं मतमोजणी आणखी लांबवणीवर पडली. अखेर सव्वा एक वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पुढील काही मिनिटांतच अहमद पटेल यांचा विजय झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

अमित शाह, स्मृती इराणी विजयी
एकीकडे पटेल विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसले तर दुसरीकडे अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी सहज विजय संपादन करून राज्यसभेची निवडणूक जिंकली. दोघांनाही प्रत्येकी ४६ मते मिळाली. या विजयामुळं अमित शहा पहिल्यांदात राज्यसभेत प्रवेश करतील.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *