ताज़ा खबरे
Home / Raftar News (page 312)

Raftar News

मेट्रो प्रकल्पाला सर्वोतोपरी मदत करू – जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेला मेट्रो प्रकल्प हा पुणे शहराबरोबरच राज्यासाठी देखील महत्त्वाचा प्रकल्प असून तो पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे काम करीत महामेट्रोला सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिले. महामेट्रोच्या घोले रस्त्यावरील महात्मा फुले संग्रहालयातील प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते आज (शनिवार) …

Read More »

छायाचित्रकारांना एकत्र आणणा-या पिक्सलेन्ट या संकेतस्थळाची सुरुवात

पुणे : जागतिक छायाचित्रदिनाचे औचित्य साधून छायाचित्रण छंद म्हणून जोपासलेल्या अथवा व्यवसाय म्हणून स्वीकारलेल्या सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी पिक्सलेन्ट या भारतातील पहिल्या संकेतस्थळाची सुरुवात पुण्यात करण्यात आली. या संकेतस्थळामुळे छायाचित्रण कलेमध्ये जास्तीत जास्त आकर्षकता आणि सफाई आणण्याबरोबरच प्रख्यात छायाचित्रकारांकडून या विषयी मार्गदर्शन मिळवण्याची संधी सहज शक्य झाली आहे. पुण्यातील डॉ. …

Read More »

कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत कोणतेही आश्वासन नाही; अल्फा लावल कंपनीचा खुलासा

पिंपरी:  अल्फा लावल कंपनीतील कंत्राटी कामगारांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन देऊनही कंपनीने ते पाळले नसल्याचा राष्ट्रीय श्रमिक आघाडीने केलेला आरोप खोटा व पूर्णतः दिशाभूल करणारा आहे. कंपनीतील कंत्राटी कामगारांसबंधीचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे असे कोणतेही आश्वासन देण्याचा प्रश्नच उद्भवत नसून कंपनीने कंत्राटी कामगारांबाबत कोणतेही आश्वासन राष्ट्रीय श्रमिक आघाडीला …

Read More »

स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आयुक्त हर्डीकर

पिंपरी: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व स्मार्ट सिटीचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी पालिका मुख्यालयात शुक्रवारी …

Read More »

जुनी सांगवीतील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम वेगात करा – प्रशांत शितोळे

पिंपरी: जुनी सांगवीतील पवनानदी घाटाजवळील स्मशानभूमीचे काम सध्या संथगतीने होत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकाना अंत्यविधी व इतर धार्मिक विधी करण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीचे काम वेगात करण्याची मागणी स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश विलंबाविरोधात शिवसेनेचे आंदोलन

पुणे: पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळातील विद्यार्थ्यांना महापालिकेकडून गणवेश पुरवण्यात येतात. मात्र, शाळा सुरू होऊन दोन महिने उलटून देखील अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात आले नाही. या विरोधात आज झालेल्या मुख्यसभेत शिवसेनेने आंदोलन केले. पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पुरवण्याची जबाबदारी  महापलिका प्रशासनाची असून त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे …

Read More »

स्मार्ट सिटीची पहिली सभा अवघ्या 25 मिनिटात गुंडाळली!

पिंपरी: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनीच्या नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली सभा (शुक्रवारी पार पडली. ही सभा अवघ्या 25 मिनिटात गुंडाळण्यात आली. बैठकीचे केवळ  सोपस्कार पार पडले. या बैठकीत कंपनी स्थापनेसह विविध 20 विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन …

Read More »

नितीश कुमार अखेर मोदींच्या छत्रछायेत; जेडीयु NDAमध्ये!

नवी दिल्ली: धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अवघ्या चार वर्षांतच मोदींच्या छत्रछायेखाली आले आहेत. नितीश यांच्या संयुक्त जनता दलानं भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज या संदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय जनता दल …

Read More »

मुंबई, ठाण्यात मुसळधार; रायगडलाही झोडपले!

मुंबई/ठाणे : मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत असून मुंबई, ठाण्यासह रायगड व विदर्भाला आज पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाण्यातील पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. तर, विदर्भात बरसणाऱ्या पावसानं तिथलं दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकलं आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात आज सकाळपासून पावसानं जोरदार बॅटिंग केली. …

Read More »

‘वंदे मातरम्’वरून औरंगाबाद महापालिकेत राडा

औरंगाबाद : ‘वंदे मातरम्’वरून सध्या देशात सुरू असलेल्या गदारोळाचे तीव्र पडसाद आज औरंगाबाद महापालिकेत उमटले. ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना-भाजप व एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये तुंबळ घोषणाबाजी झाली. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीनंतर सेना-एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्कीही झाली. सभागृहातील माइक, पंख्यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी तीन नगरसेवकांना निलंबित करण्यात आलं आहे. औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधार सभेला …

Read More »