ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत कोणतेही आश्वासन नाही; अल्फा लावल कंपनीचा खुलासा

कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत कोणतेही आश्वासन नाही; अल्फा लावल कंपनीचा खुलासा

पिंपरी:  अल्फा लावल कंपनीतील कंत्राटी कामगारांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन देऊनही कंपनीने ते पाळले नसल्याचा राष्ट्रीय श्रमिक आघाडीने केलेला आरोप खोटा व पूर्णतः दिशाभूल करणारा आहे. कंपनीतील कंत्राटी कामगारांसबंधीचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे असे कोणतेही आश्वासन देण्याचा प्रश्नच उद्भवत नसून कंपनीने कंत्राटी कामगारांबाबत कोणतेही आश्वासन राष्ट्रीय श्रमिक आघाडीला दिलेले नाही, असे खुलासा अल्फा लावल कंपनीने केला आहे.

याबाबत कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय श्रमिक आघाडी ज्या काही कंत्राटी कामगारांचे प्रतिनिधित्व करते ते अल्फा लावल कंपनीचे कर्मचारी नाहीत. ते संबंधित कंत्राटदारांचे कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचे मुद्दे अल्फा लावलकडे न आणता थेट संबंधित कंत्राटदारांकडे न्यावेत, अशी कंपनीची भूमिका आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडी कंपनीच्या कर्मचा-यांचे प्रतिनिधित्व करीत नाही. कंपनीमध्ये एक अधिकृत मान्यता असलेली कर्मचारी संघटना आहे. कंत्राटी कामगार या संघटनेचे सदस्य नाहीत. कंपनीने कंत्राटदारांच्या सेवा पूर्णतः कायद्याच्या चौकटीत राहूनच घेतल्या आहेत.

या कंत्राटी कामगारांचा मुद्दाच न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे कंत्राटी कामगार तीन ऑगस्ट रोजी कंपनीच्या दापोडी येथील कारखान्यामध्ये कामावर रूजू होण्यासाठी आले होते हा, श्रमिक आघाडीचा दावा चुकीचा आहे. कंत्राटी कामगारांना कंपनीच्या सेवेत परत घेण्यात यावे अशा आशयाची मागणी करणारे एक निवेदन राष्ट्रीय श्रमिक आघाडीने तीन ऑगस्ट रोजी कंपनीला दिले होते. हे पत्र कंपनीच्या सुरक्षा कर्मचा-याने स्वीकारले. मात्र या पत्रावर असलेला ‘ कंपनी या मुद्द्यावर सकारात्मक बैठक घेईल’ असा पोचपावतीवजा शेरा राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या नेत्यांनी सुरक्षा कर्मचा-यांकडून बळजबरीने लिहून घेतला आहे, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.-

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *