ताज़ा खबरे
Home / Raftar News (page 301)

Raftar News

पुणे विभागातील रेल्वेगाड्यांच्या वेळेत उद्यापासून बदल; प्रशासनाचा निर्णय

पुणे : भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकात १ नव्हेंबरपासून बदल होत असून पुणे विभागातील काही गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे़ त्यात पुण्याहून सुटणारी पुणे -मुंबई डेक्कन एक्सप्रेस (११००८) ही गाडी आता दुपारी १५. ३० ऐवजी १५ मिनिटे अगोदर १५़. १५ वाजता सुटणार आहे़ मुंबईला ही गाडी १९. ३५ ऐवजी १९. १७ वाजता पोहचेल़याशिवाय …

Read More »

वल्लभभाई पटेलांमुळे देशाची अखंडता; आयुक्‍त श्रावण हर्डीकर

पिंपरी– देशाची अखंडता राखण्याचे काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले असून देशभरात त्यांच्या जयंतीनिमीत्त एकता दौड आयोजित केली जाते. ही दौड देशातील राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी मदत करीत असून यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होत आहे. त्यामुळे हा देश एक राहिल, देशाची अखंडता कायम राहणार असून कोणतीही शक्ती देशात …

Read More »

महामेट्रोला हवी पालिकेची मोकळी जागा; मेट्रोलगत पाच ठिकाणी होणार पार्किंग!

पिंपरी– पीएमपीएमएल बस प्रवासी वाहतूक सेवा सक्षम नसल्यामुळे खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. भविष्यात स्टेशनवरून मेट्रोने प्रवास करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची खासगी वाहने सुरक्षीत ठेवण्यासाठी पुणे महामेट्रो व्यवस्थापनाच्या वतीने पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गालगत पाच ठिकाणी वाहनतळ विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी महामेट्रोने वाहनतळ अथवा अन्य नियोजित प्रकल्पांसाठीच्या आरक्षीत मोकळ्या जागेची मागणी केली …

Read More »

विजेच्या समस्येविषयी तोडगा काढण्यासाठी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

पिंपरी। (PNE)- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विजेचा लपंडाव गेली अनेक दिवसांपासून चालू आहे. तक्रारीसाठी फोन केला असता तक्रारी घेतल्या जात नाहीत, अशा नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (मंगळवारी दि.31 ऑक्टोबर ) पुणे विभागाचे मुख्य अभियंता एम.जी. शिंदे यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात बैठक घेतली. या …

Read More »

देहूतील भूमिपुत्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संरक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – खासदार अमर साबळे

पुणे। (PNE)- देहू आणि आसपासच्या परिसरात रेडझोनच्या प्रश्नामुळे स्थानिक भूमिपुत्र शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. तसेच नागरी जीवन विस्कळीत झाले आहे. यासंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्र्यांशी चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी देहू येथे दिले. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पादुकास्थान …

Read More »

हिवाळी अधिवेशनात रिक्षा चालक-मालकांसाठी महामोर्चा काढणार– बाबा कांबळे

पुणे। (PNE)- रिक्षा चालक-मालकांसाठी, कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, त्यांना वृद्धावस्थेत पेन्शन मिळावी, बेकायदेशीर वाहतूक बंद व्हावी, ओला, उबेर सारख्या भांडवलदार कंपन्यांवर, बोगस परवानाधारकांवर कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांसाठी राज्यातील १५ लाख रिक्षा चालक मालकांच्या वतीने डिसेंबरमध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष आणि …

Read More »

पश्चिम बंगाल येथील असनसोल महापालिकेच्या महापौरांची पिंपरी महापालिकेस भेट

पुणे। (PNE)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामकाजासह विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगाल येथील असनसोल महापालिकेचे महापौर जितेंद्र तिवारी यांचे स्वागत महापौर नितीन काळजे यांनी केले. महापौर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी नगरसदस्य सुरेश भोईर आदी उपस्थित होते. यावेळी महापौर नितीन काळजे यांनी महापालिकेच्या कामकाजाची व विविध विकास प्रकल्पांची सविस्तर …

Read More »

दोन दिवसांत अनधिकृत फेरीवाले हटवा, अन्यथा पुण्यातही मनसेचे खळखट्याक

पुणे। (PNE)- मुंबईमधील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेकडून आक्रमक आंदोलन केले जात आहे. आता मुंबई पाठोपाठ पुण्यातही परप्रांतीय अनधिकृत फेरीवाले मनसेच्या टार्गेटवर आले आहेत. फेरीवाल्यांवर दोन दिवसांत कारवाई करण्याचे पत्र मनसेकडून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला आहे. मुंबईतील …

Read More »

संप केलेल्या एसटी कर्मच्या-यांचा 36 दिवसांचा पगार कापणार

पुणे। (PNE)- ऐन दिवाळीमध्ये संपावर जाऊन प्रवाशांना वेठीला धरणाऱ्या एस टी कर्मच्या-यांना राज्य सरकारने आणखी एक दणका दिला आहे. संपावर गेलेल्या कर्मच्या-यांचा 36 दिवसाचा पगार कापण्याचा निर्णय परिवहन आयुक्तांनी घेतला आहे. एसटी ही जीवनावश्यक सुविधांमध्ये मोडत असून नियमानुसार एका दिवसाच्या संपाला आठ दिवसांचा पगार कापला जातो. त्यानुसार चार दिवसाच्या संपाचे …

Read More »

कचरा प्रकल्पाच्या विरोधात भोंगा वाजवून राष्ट्रवादीकडून पालिकेचा निषेध

पुणे। (PNE)- पुणे महापालिकेच्या हद्दीतील हडपसर येथील रामटेकडी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या 700 टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प विरोधातील आंदोलन आणखी तीव्र होत आहे. या कचरा प्रकल्पाला विरोध दर्शवण्यातसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आज दुसऱ्या दिवशी महापौर, आयुक्त, पालकमंत्री व मुख्यमंत्री व भाजपा सत्ताधा-यांना जाग …

Read More »