ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / संप केलेल्या एसटी कर्मच्या-यांचा 36 दिवसांचा पगार कापणार

संप केलेल्या एसटी कर्मच्या-यांचा 36 दिवसांचा पगार कापणार

पुणे। (PNE)- ऐन दिवाळीमध्ये संपावर जाऊन प्रवाशांना वेठीला धरणाऱ्या एस टी कर्मच्या-यांना राज्य सरकारने आणखी एक दणका दिला आहे. संपावर गेलेल्या कर्मच्या-यांचा 36 दिवसाचा पगार कापण्याचा निर्णय परिवहन आयुक्तांनी घेतला आहे.
एसटी ही जीवनावश्यक सुविधांमध्ये मोडत असून नियमानुसार एका दिवसाच्या संपाला आठ दिवसांचा पगार कापला जातो. त्यानुसार चार दिवसाच्या संपाचे 32 दिवस व चार दिवस पुकारलेला संप म्हणून त्या चार दिवसांचा म्हणजे एकूण 36 दिवसांचा पगार कापला जाणार आहे.
हा पगार टप्प्या-टप्प्याने म्हणजे प्रत्येक महिन्याला चार दिवस असा सहा महिन्यात हा पगार कापला जाणार आहे. हा निर्णय जुलमी असून या निर्णयाविरुद्ध कामगार न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. या निर्णयामुळे एस.टी.कर्मचारी व सरकार हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयाबाबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेने म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत एसटी कामगार संप मिटवून कामावर त्वरित हजर झाले. पाजारवाढी संदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाने वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमली आहे. सादर समिती कामगार संघटनांशी चर्चा करून २२ डिसेम्बर पर्यंत अंतिम अहवाल सादर करणार आहे. अशा परिस्थितीत वरील संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे ‘ना काम ना दाम’ या तत्वाप्रमाणे वेतनकपात करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे प्रशासनाने एसटी कर्मच्या-यांमध्ये अधिक नाराजी न पसरवता वेतन कपातीचा निर्णय तातडीने माघारी घ्यावा अशा मागणीचे निवेदन एसटी प्रशासनाला दिले आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *