ताज़ा खबरे
Home / पिंपरी / चिंचवड / दोन दिवसांत अनधिकृत फेरीवाले हटवा, अन्यथा पुण्यातही मनसेचे खळखट्याक

दोन दिवसांत अनधिकृत फेरीवाले हटवा, अन्यथा पुण्यातही मनसेचे खळखट्याक

पुणे। (PNE)- मुंबईमधील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेकडून आक्रमक आंदोलन केले जात आहे. आता मुंबई पाठोपाठ पुण्यातही परप्रांतीय अनधिकृत फेरीवाले मनसेच्या टार्गेटवर आले आहेत. फेरीवाल्यांवर दोन दिवसांत कारवाई करण्याचे पत्र मनसेकडून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला आहे.
मुंबईतील एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबई रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यासाठी राज ठाकरे यांनी चर्चगेट येथे मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी प्रशासनाने अनाधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यासाठी प्रशासनाला 15 दिवसांची मुदत दिली होती. या मुदतीनंतर फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेने ठाण्यापासून वसईपर्यंत आणि मालाड ते कल्याण-डोंबिवलीपर्यंत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांना हटविले. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील अनधिकृत परप्रांतीय फेरीवाले मनसेच्या रडारवर असणार आहेत.
मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी याबाबत सांगितले की, फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे पत्र महापालिकेला देण्यात आले असून पालिकेकडून कारवाई न झाल्यास खळखट्याक आंदोलन करून अनधिकृत फेरीवाल्याना मनसे हटवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

चाकण से युवक का अपहरण…हत्या…चाकण पुलिस हत्यारे को दवोचा

पिंपरी- 18 वर्षीय लड़के आदित्य युवराज भंगारे का मार्च में महालुंगे पुलिस स्टेशन क्षेत्र से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *