ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / कचरा प्रकल्पाच्या विरोधात भोंगा वाजवून राष्ट्रवादीकडून पालिकेचा निषेध

कचरा प्रकल्पाच्या विरोधात भोंगा वाजवून राष्ट्रवादीकडून पालिकेचा निषेध

पुणे। (PNE)- पुणे महापालिकेच्या हद्दीतील हडपसर येथील रामटेकडी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या 700 टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प विरोधातील आंदोलन आणखी तीव्र होत आहे. या कचरा प्रकल्पाला विरोध दर्शवण्यातसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आज दुसऱ्या दिवशी महापौर, आयुक्त, पालकमंत्री व मुख्यमंत्री व भाजपा सत्ताधा-यांना जाग आणण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोंगे वाजवून आंदोलन करण्यात आले.
यावेळी हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, नगरसेवक अशोक कांबळे, माजी महापौर वैशाली बनकर, सुनील बनकर, कलेश्वर घुले, सागरराजे भोसले, दत्तात्रय राऊत, गणेश ससाणे, सतीश हिंगणे, राष्ट्रवादी सेवादल शहराध्यक्ष योगेश जगताप, राहुल होले, आप्पा गरड, सुरेश सातपुते, सतीश शिंदे तसेच साधना विद्यालयातील मुले व मुली सुध्दा या भोंगा आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शाळकरी मुलांनी भोंगा वाजवुन हडपसरला नवीन कचरा प्रकल्प लादू नका आमच्या आरोग्याशी खेळु नका सर्व सत्ताधाऱ्यांना आवाहन केले.
यावेळी योगेश ससाणे म्हणाले, ” निवेदने, पत्रे व विनंती करूनही भाजप सत्ताधारी आणि प्रशासन कचरा प्रकल्पाचे काम बंद करीत नाहीत, हा सत्तेचा गैरवापर असून आठ दिवस राष्ट्रवादीच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल. नव्याने होत असलेला हा प्रकल्प बंद केला नाही तर आंदोलनाला हिंसक वळण लागेल नागरिकांच्या आरोग्याशी चालविलेला खेळ पालिकेने थांबवावा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा देण्यात आला आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *