ताज़ा खबरे

तामीळनाडू प्रिमिअर लीग क्रिकेटवर सट्टा: राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह पाच जणांना अटक

पिंपरी: काळभोरनगर येथील राष्ट्रवादीचे नगरेवक जावेद रमजान शेख यांना तामीळनाडू प्रिमीअर लीग क्रिेकेटवर सट्टा लावत असताना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. चिखली येथील साने बिल्डींगमध्ये हा सट्टा चालू होता. काल (मंगळवारी) रात्री निगडी पोलिसांनी छापा टाकत शेख यांच्यासह पाच आरोपींना अटक केली. यामध्ये आरोपींकडून दोन लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल …

Read More »

घरफोडी व वाहनचोरीचे 16 गुन्हे निगडी पोलिसांकडून उघड

पिंपरी: निगडी पोलिसांनी तीन वेगवेगळ्या कारवाईमध्ये घऱफोडी वाहनचोरीचे असे एकूण 16 गुन्हे उघडकीस आणले असून याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. यामध्ये पोलिसांनी सहा लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संतोष मदनराव देशमुख (वय 23 रा. जाधववाडी चिखली, मुळ- मुलावागाव, उमरखेड जि. यवतमाळ) याच्याकडून दहा दुचाकीचे गुन्हे उघडकीस आले …

Read More »

पवना धरण 98 टक्के भरले; पिंपरी-चिंचवडकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला !

पिंपरी: पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण तुडुंब भरले आहे. धरणात 98.45 टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे शहरवासियांचा एक वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मावळसह पिंपरी-चिंचवडकारांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पवना धरण परिसरात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. पाण्यात वाढ झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून …

Read More »

च-होलीतील भूसंपादनाचा मार्ग मोकळा; शहर सुधारण समितीची मंजुरी

पिंपरी: च-होली परिसरातील चोविसावाडी व वडमुखवाडी येथील मंजूर विकास योजनेमधील रस्त्यांचे भूसंपादन करण्याचे विषय शहर सुधारणा समितीने मंजूर केले आहेत. महापालिका सभेच्या मान्यतेसाठी पाठविले आहेत, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली. सुधारणा समिती सभापती सागर गवळी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. च-होली परिसरातील विविध रस्त्यांच्या भूसंपादनाचे विषय मंजूर करण्याबाबत …

Read More »

बैलगाडा शर्यतीच्या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी- महादेव जानकर

मुंबई: बैलगाडा शर्यतीच्या कायद्याला सरकारने अधिसुचनेद्वारे राजपत्रात प्रसिध्दी दिलेली असून शर्यतीबाबत नियम अटी प्रसारीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. लवकरच सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण होऊन धावपट्टीवर शर्यती चालू होतील असे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. बैलगाडा शर्यतीच्या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत आमदार महेश लांडगे व अखिल भारतीय बैलगाडा …

Read More »

एसीपीजीच्या वाहनांमध्ये जीव गुदमरतो: राहुल गांधी

नवी दिल्ली : गुजरात दौऱ्यावर असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ते स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची (एसपीजी) वाहने का घेऊन जात नाहीत? असा पलटवार भाजपकडून करण्यात आला होता. मात्र राहुल यांनी गेल्यावर्षीच एसपीजीची वाहने खटारा असून त्यात जीव गुदमरतो. ही वाहने आरोग्यासाठी धोकादायक आहेत, अशी तक्रार केली होती. पण त्यावर …

Read More »

बलात्काराचा प्रयत्न फसला, इमारतीवरून फेकले

नवी दिल्ली : वहिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न फसल्याने दिराने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून तिला फेकून दिलं. तिचं नशीब बलवत्तर म्हणून शेजाऱ्यांनी तिला तात्काळ रूग्णालयात नेलं आणि ती बचावली. दिल्लीच्या वजीरपूर येथे रविवारी ही धक्कादायक घटना घडली. ही महिला घरात एकटीच होती. या संधीचा फायदा घेत तिच्या …

Read More »

बिहारः तेजस्वी यादवांची ‘जनादेश अपमान यात्रा’

पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आजपासून महात्मा गांधी यांची कर्मभूमी चम्पारण येथून ‘जनादेश अपमान यात्रा’ सुरू करणार आहेत. तेजस्वी यादव यांची ही यात्रा यशस्वी व्हावी यासाठी त्यांची आई व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी तेजस्वी यांना टिळा लावून शुभेच्छा दिल्या. बिहारमधील जनतेने आरजेडी आणि जदयू या दोन पक्षांना …

Read More »

मराठा आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करा: रामदास आठवले

मुंबई: मराठा समाजाला नोकरी व शिक्षणामध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे, असे स्पष्ट करतानाच मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेल्या मुंबईतील मोर्चाला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी ही घोषणा केली. मराठा समाजासह देशातील गुर्जर, …

Read More »

भाजपला धक्का; गुजरातमधून अहमद पटेल राज्यसभेवर!

गांधीनगर : काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी विजय मिळवत राज्यसभेची जागा कायम राखली आहे. तर इतर दोन जागांवर अपेक्षेप्रमाणे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी विजय मिळवला आहे. पटेल यांच्या विजयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. …

Read More »