ताज़ा खबरे
Home / पिंपरी / चिंचवड / तामीळनाडू प्रिमिअर लीग क्रिकेटवर सट्टा: राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह पाच जणांना अटक

तामीळनाडू प्रिमिअर लीग क्रिकेटवर सट्टा: राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह पाच जणांना अटक

पिंपरी: काळभोरनगर येथील राष्ट्रवादीचे नगरेवक जावेद रमजान शेख यांना तामीळनाडू प्रिमीअर लीग क्रिेकेटवर सट्टा लावत असताना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. चिखली येथील साने बिल्डींगमध्ये हा सट्टा चालू होता. काल (मंगळवारी) रात्री निगडी पोलिसांनी छापा टाकत शेख यांच्यासह पाच आरोपींना अटक केली. यामध्ये आरोपींकडून दोन लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जावेद रमजान शेख (वय. 47 रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी), नवीन भगवान मित्तल (वय 43 रा. मित्तल बिल्डींग, चिखली), राकेश नेमिचंद मेहता (वय 37 रा. बालाजीनगर धनकवडी), प्रवीण शिवाजी पवार (वय 36 रा. दत्तवाडी आकुर्डी) जाकीर मस्तान शेख (वय 29 रा. विद्यानगर चिंचवड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

चिखलीच्या मित्तल बिल्डींग मधील एका फ्लॅटमध्ये सट्टा लावण्याचे काम सुरु असल्याची खबर पोलिसांना मिळाली. खबर मिळताच पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकून पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, लॅपटॉप,मोबाईल, रोख 53 हजार 500 रुपये असा एकूण 2 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पाचही जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण अधिक तपास करत आहेत.

Check Also

चाकण से युवक का अपहरण…हत्या…चाकण पुलिस हत्यारे को दवोचा

पिंपरी- 18 वर्षीय लड़के आदित्य युवराज भंगारे का मार्च में महालुंगे पुलिस स्टेशन क्षेत्र से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *