ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / एसीपीजीच्या वाहनांमध्ये जीव गुदमरतो: राहुल गांधी

एसीपीजीच्या वाहनांमध्ये जीव गुदमरतो: राहुल गांधी

नवी दिल्ली : गुजरात दौऱ्यावर असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ते स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची (एसपीजी) वाहने का घेऊन जात नाहीत? असा पलटवार भाजपकडून करण्यात आला होता. मात्र राहुल यांनी गेल्यावर्षीच एसपीजीची वाहने खटारा असून त्यात जीव गुदमरतो. ही वाहने आरोग्यासाठी धोकादायक आहेत, अशी तक्रार केली होती. पण त्यावर सरकारने काहीच कार्यवाही केली नसल्याचं उघड झालं आहे.
राहुल गांधी यांच्या कार्यालयातून २०१६ मध्ये एसपीजीच्या वाहनांची तक्रार करण्यात आली होती. राहुल यांच्या ताफ्यात असलेली एसपीजीची वाहने आरोग्याला हानीकारक आहेत. त्यात व्हेंटिलेशनचा अभाव आहे. गाडीच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये त्रुटी असून आसनाची ठेवणही व्यवस्थित नसल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. शिवाय गाडीची काच पूर्णपणे उघडली जात नाही. त्यामुळे लोकांशी संवाद साधण्यास आणि त्यांचं अभिवादन स्विकारण्यात अडचणी येतात. तसेच गाडीला लावलेले कवच व्यर्थ असल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
एसपीजीचे प्रमुख विवेक श्रीवास्तव यांना हे पत्र लिहिण्यात आले असून त्यात संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रार करण्यात आल्याचंही म्हटलं आहे. पण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावताना मी आणि अरूण जेटलीही याच गाड्यांचा वापर करतो, असं स्पष्ट केलं होतं.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *