ताज़ा खबरे
Home / पिंपरी / चिंचवड / बैलगाडा शर्यतीच्या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी- महादेव जानकर

बैलगाडा शर्यतीच्या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी- महादेव जानकर

मुंबई: बैलगाडा शर्यतीच्या कायद्याला सरकारने अधिसुचनेद्वारे राजपत्रात प्रसिध्दी दिलेली असून शर्यतीबाबत नियम अटी प्रसारीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. लवकरच सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण होऊन धावपट्टीवर शर्यती चालू होतील असे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.

बैलगाडा शर्यतीच्या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत आमदार महेश लांडगे व अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या सदस्यांनी पशुसंवर्धन मंत्री महादेव आणि पशुसंवर्धन विभागाचे सचिव श्री विकास देशमुख यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले.

गणेश फेस्टीवल जवळ आल्याने व बैलगाडा मालकांची बैलगाडे पळविण्याची सुरुवात गणेश फेस्टीवलपासून करण्याची अनेक वर्षाची परंपरा असल्याचे आमदार महेश लांडगे यानी सांगितले. यावेळी आमदार राहुल कुल तसेच अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे नितीन शेवाळे,संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर ,कृषि उत्पंन्न बाजार समितीचे सभापती नवनाथ शेठ होले, अनिल लांडगे, केतन जोरे, नितीन टाकळकर उपस्थित होते.

Check Also

चाकण से युवक का अपहरण…हत्या…चाकण पुलिस हत्यारे को दवोचा

पिंपरी- 18 वर्षीय लड़के आदित्य युवराज भंगारे का मार्च में महालुंगे पुलिस स्टेशन क्षेत्र से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *