ताज़ा खबरे
Home / पिंपरी / चिंचवड (page 207)

पिंपरी / चिंचवड

युवक रोजगार प्रशिक्षणाचा प्रस्ताव स्थायी’ने फेटाळला

पिंपरी। पिंपरी-चिंचवड महापालिका शहर सुधारणा समितीमार्फत आलेल्या मागासवर्गीय, भटक्या जाती-जमातीतील तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याकामी संस्था नियुक्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला आहे. निविदा प्रक्रिया राबवा, निविदांमध्ये स्पर्धा झाल्यावरच संस्थेची नेमणूक करा, अशा सूचनाही स्थायी समितीने दिल्या. मागासवर्गीय, भटक्या जाती-जमातीतील तरुणांना रोजगारासाठी तीन ते एकवीस तासांचे रोजगाराभिमुख व्यवसाय प्रशिक्षण द्यावे, असा …

Read More »

आयुक्तसाहेबांनाच सल्ला देण्यासाठी सल्लागार नेमण्याची मागणी!

पिंपरी। पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून पेव्हींग ब्लॉक बसविण्याचे काम, रस्त्यांच्या कामापासून ते स्मार्ट सिटी सारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमले जात आहेत. पेव्हींग ब्लॉक बसविण्याच्या किरकोळ कामासाठी देखील पालिका करदात्या नागरिकांच्या पैशातून सल्लागार नेमत आहे. त्यामुळे आता पालिका आयुक्तांना सल्ला देण्यासाठी सल्लागार नेमण्याची उपरोधिक मागणी, सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी …

Read More »

रस्ते, गटर साफसफाईचे काम करणा-या 64 संस्थांना तीन महिन्याची मुदतवाढ

पिंपरी। ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्ते, गटर यांच्या साफसफाईसाठी नेमण्यात आलेल्या 64 स्वयंरोजगार व बेरोजगार सेवा संस्थांना पुन्हा तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. दोन संस्थांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याने नवीन निविदा प्रक्रीया रखडली आहे. तीन महिने कालावधीसाठी या कामगारांच्या पगारावर चार कोटी 60 लाख 90 हजार 920 …

Read More »

‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन’साठी सल्लागाराची नेमणूक; साडेसात कोटी रुपयांचा खर्च

पिंपरी। ‘स्मार्ट सिटी’त सहभागी झालेली पिंपरी-चिंचवड महापालिका विविध प्रकल्प राबविणार आहे. त्यासाठी सिटी ट्रान्फॉर्मेशन ऑफीस’ हे नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्यात आले आहे. यासाठी ‘पॅलाडिअम’ या सल्लागार संस्थेची दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली असून या संस्थेला सात कोटी 45 लाख 20 हजार रुपये देण्यात येणार आहेत. या विषयाला स्थायी समितीने आज …

Read More »

स्वाईन फ्लू मुळे ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; मृतांची संख्या 61 वर

पिंपरी। चिंचवड येथील 68 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूमुळे आज (बुधवारी) मृत्यू झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात मृतांची संख्या 61 वर पोहचली आहे. संबंधीत महिलेला 8 नोव्हेंबर रोजी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागातही दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा उपचारा दरम्यान आज मृत्यू झाला.1 जानेवारी …

Read More »

लष्कराकडून बोपखेल उड्डाणपुलाला जागा देण्याची कार्यवाही; आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलगावचा रस्त्याचा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. लष्कराकडून जागा मिळत नसल्याने बोपखेल ते खडकी दरम्यान मुळा नदीवरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम कागदावर राहिले होते. परंतु, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी वारंवार दिल्ली दरबारी जाऊन उड्डाणपुलाला लष्कराची जागा मिळवण्यासाठी …

Read More »

अनधिकृत बांधकामे नियमित करणाचा निर्णय; बांधकाम व्यावसायिकांना फायदा- श्रीरंग बारणे

पिंपरी: अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार एक ते दीड गुंठ्यातील बांधकामांना चार ते पाच लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे नियमित केल्यास या  दंडाच्या रकमेपोटी पालिकेला दीड ते दोन हजार कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे.  अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्यांना …

Read More »

ताथवडेतील शाळेचे हस्तांतर प्रक्रिया सुरु करण्याची मागणी

– महापालिका शिक्षण मंडळाच्या अधिका-यांना निवेदन – सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांचा पुढाकार पिंपरी (PNE)- ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळेचे महामापालिका प्रशासनाकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांनी केली आहे.  महापालिका शिक्षण मंडळाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये २००९ साली …

Read More »

ताथवडेतील शाळा हस्तांतराचा मार्ग मोकळा; संदीप पवार यांच्या प्रयत्नांना यश

उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील पिंपरी।(PNE) – गेल्या आठ वर्षांपासून महापालिका प्रशासनाच्या सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या ताथवडे येथील शाळेचा वनवास अखेर संपला आहे. शाळेच्या महापालिका हस्तांतराला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये समाधान व्यक्‍त होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये 2009 साली ताथवडे गावचा समावेश करण्यात आला. त्याचवेळी या गावातील …

Read More »

धुळे जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल होऊ शकतात तर पुण्यातील का नाही ? – विनोद तावडे

पिंपरी। (PNE)-जिल्हयातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील शाळा शिक्षकांच्या प्रयत्नामुळे डिजिटल झाल्या आहेत. तर पुणे-मुंबई सारख्या शहरात शाळा डिजिटल का होऊ शकत नाही, असा प्रश्न शालेय शिक्षण, क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी  उपस्थित केला. तसेच शाळा डिजिडल करण्याचे आव्हान शिक्षकांनी स्वीकारले पाहिजे, असे मतही व्यक्त केले. त्यासोबतच यासाठी लागणारी सर्व …

Read More »