ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / धुळे जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल होऊ शकतात तर पुण्यातील का नाही ? – विनोद तावडे

धुळे जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल होऊ शकतात तर पुण्यातील का नाही ? – विनोद तावडे

पिंपरी। (PNE)-जिल्हयातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील शाळा शिक्षकांच्या प्रयत्नामुळे डिजिटल झाल्या आहेत. तर पुणे-मुंबई सारख्या शहरात शाळा डिजिटल का होऊ शकत नाही, असा प्रश्न शालेय शिक्षण, क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी  उपस्थित केला. तसेच शाळा डिजिडल करण्याचे आव्हान शिक्षकांनी स्वीकारले पाहिजे, असे मतही व्यक्त केले. त्यासोबतच यासाठी लागणारी सर्व आवश्यक मदत देण्याचे आश्वासनही तावडे यांनी दिले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, सत्तारुढ नेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, आयक्त श्रावण हार्डीकर  आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

ते पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांना मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार  गुणवत्तेवर आधारित आहे. हा खरा शिक्षकांचा सन्मान आहे. परिणामकारक अध्यापनासाठी शिक्षकांनी वेगवेगळे प्रयोग करण्याची गरज आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यासाठी त्यांनी सोलापूर शाळेचे उदाहरण दिले. राज्यातील फक्त साडेचार हजार शाळेतील निकाल 80 टक्यांच्या खाली आहेत. त्यांना विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयन्त करा, असे सांगणे हे चुकीचे नाही. शिक्षकांना 12 व 24 वर्षानंतर मिळणारी उच्च वेतन श्रेणी ही शिक्षकांनी केलेल्या अध्यापनाच्या कसोटीवर आधारित आहे. ज्या शाळांचे आठवी नववीचे निकाल 80 टक्क्यांपेक्षा जास्त असतील त्या शाळेतील पात्र शिक्षकांना ही वेतन श्रेणी मिळणार आहे. वाढत्या इंग्रजी शाळांचा प्रभाव रोखण्यासाठी जुन्नर तालुक्यातील 14 हजार इंग्रजी शाळेतील विद्यार्थी प्राथमिक शाळेकडे वळले. त्याबद्दल तेथील शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख त्यांनी केला व नागपूरच्या अधिवेशनात त्या शिक्षकांचा सन्मानही केला.

मनपा प्राथमिक शाळेतील गुणवंत शिक्षक पुरस्कार पुढीलप्रमाणे –

जयश्री कुंडलिक जाधव, उर्मिला बिभीषण फलफले, दिलीप रामदास थोरात, विठ्ठल हरिश्चंद्र बगाटे, संगीता सुभाष चटणे, ज्योत्स्ना रामदास चौधरी, रवींद्र वसंत लाड, तर खाजगी माध्यमिक शाळेतील गुणवंत शिक्षक पुरस्कार – शामला रामचंद्र पंडित, अमोल जयंत नवलपुरे, वाल्हेकर शंकर सोपानराव यांना तर खाजगी प्राथमिक शाळेतील गुणवंत शिक्षकांमध्ये वंदना अविनाश सावंत, सुहासिनी सुहास शिंदे, विनोद भीमराव फंड, अर्चना यशोधन गोरे, सविता हेलनस ट्रॅवीस, रुबिका चेतन खरात, ताम्हनकर स्वाती संजय, विजयालक्ष्मी शिवराम हाके, शिंदे दिपाली राजेश यांना पुरस्कार देण्यात आले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *