ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन’साठी सल्लागाराची नेमणूक; साडेसात कोटी रुपयांचा खर्च

‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन’साठी सल्लागाराची नेमणूक; साडेसात कोटी रुपयांचा खर्च

पिंपरी। ‘स्मार्ट सिटी’त सहभागी झालेली पिंपरी-चिंचवड महापालिका विविध प्रकल्प राबविणार आहे. त्यासाठी सिटी ट्रान्फॉर्मेशन ऑफीस’ हे नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्यात आले आहे. यासाठी ‘पॅलाडिअम’ या सल्लागार संस्थेची दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली असून या संस्थेला सात कोटी 45 लाख 20 हजार रुपये देण्यात येणार आहेत. या विषयाला स्थायी समितीने आज (बुधवारी) आयत्यावेळी मान्यता दिली आहे.
जेएनएनयुआरएम, अमृत अभियान, स्वच्छ हिंदुस्थान अभियान, स्मार्ट सिटी अभियान, पंतप्रधान अवास योजना अशा विविध योजना महापालिका हद्दीत राबविण्यात येत आहेत. हे प्रकल्प कालमर्यादेत व वेळेत पूर्ण करण्यासाठी या कामांकरिता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागार संस्थेची मदत घेणे आवश्यक असते. त्यामुळे सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात ‘सिटी ट्रान्फॉर्मेशन ऑफीस’ हे नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात महसुली जमा खर्चात माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे सिटी ट्रान्फॉर्मेशन ऑफीस हे नवीन लेखाशिर्ष निर्माण केले आहे. त्यावर तीन वर्षे कालावधीसाठी 14 कोटी 31 लाख रूपये खर्च येणार आहे.
‘सिटी ट्रान्फॉर्मेशन ऑफीस’साठी ‘पॅलाडिअम’ या सल्लागार संस्थेची दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ही संस्था शहराच्या विकासाचे नियोजन करणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत प्राधान्याने कोणते प्रकल्प हाती घ्यायचे हे निश्चित करणार आहे. महापालिकेला मदत करण्यासाठी या संस्थेची नियुक्ती केली आहे. ही संस्था 120 देशामध्ये काम करते.
यामुळे ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प वेळेत मार्गी लागण्यासाठी फायदा होणार आहे. या संस्थेची दोन वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे काम चांगले असल्यास त्यांना पुन्हा सहा महिन्याची मुदत वाढ दिली जाईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *