ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / रस्ते, गटर साफसफाईचे काम करणा-या 64 संस्थांना तीन महिन्याची मुदतवाढ

रस्ते, गटर साफसफाईचे काम करणा-या 64 संस्थांना तीन महिन्याची मुदतवाढ

पिंपरी। ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्ते, गटर यांच्या साफसफाईसाठी नेमण्यात आलेल्या 64 स्वयंरोजगार व बेरोजगार सेवा संस्थांना पुन्हा तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. दोन संस्थांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याने नवीन निविदा प्रक्रीया रखडली आहे. तीन महिने कालावधीसाठी या कामगारांच्या पगारावर चार कोटी 60 लाख 90 हजार 920 रूपये खर्च होणार आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीन जुन्या रचनेनुसार ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘इ’ आणि ‘फ’ या सहा क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रस्ते व गटर्स साफसफाईचे काम स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, बेरोजगार सहकारी सेवा संस्था आणि मजूर सहकारी संस्थांना किमान वेतन दराने देण्यात येते. सदर दोन वर्षे कालावधीच्या या कामासाठी 87 पैकी 68 संस्था पात्र ठरल्या असून, त्याद्वारे एकूण 925 कामगार किमान वेतन दराने पुरविले जात आहेत. या कामाची मुदत 31 मार्च 2017 ला संपली आहे.
सदर कामाची नवीन निविदा प्रसिद्ध केल्याने पिंपरी-चिंचवड शहर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन व श्री संत गाडगेबाबा महाराज बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2017 पर्यंतचे मुतवाढीच्या कामास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. आदेश मिळेपर्यंत निविदा कार्यवाही सुरू ठेवावी. मात्र, कामाचा अंतिम आदेश देऊ नये असे दोन नोव्हेंबरच्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले आहे.
शहरातील रस्ते, गटर यांची नियमित साफसफाई न झाल्यास नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे काम बंद करणेही उचित ठरणार नाही. त्यामुळे संबंधित 68 ठेकेदार संस्थांना मुदतवाढ न देता काम बंद ठेवणे उचित नसल्याचे महापालिका प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या या संस्थांना कामास 1 ऑक्टोबर 2017 पासून 31 डिसेंबरपर्यंत तीन महिने मुदतवाढ देण्यात आली.
किमान वेतन 16 हजार 609 रूपये 34 पैसे असल्याचे कळविले आहे. त्यानुसार 915 कामगारांचा मासिक खर्च एक कोटी 53 लाख 63 हजार 640 रूपये होतो. त्यानुसार, तीन महिने कालावधीसाठी चार कोटी 60 लाख 90 हजार 920 रूपये खर्च अपेक्षित आहे. स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *