ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / स्वाईन फ्लू मुळे ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; मृतांची संख्या 61 वर

स्वाईन फ्लू मुळे ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; मृतांची संख्या 61 वर

पिंपरी। चिंचवड येथील 68 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूमुळे आज (बुधवारी) मृत्यू झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात मृतांची संख्या 61 वर पोहचली आहे.
संबंधीत महिलेला 8 नोव्हेंबर रोजी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागातही दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा उपचारा दरम्यान आज मृत्यू झाला.1 जानेवारी ते आजअखेर 413 रुग्ण सदोष आढळले आहेत तर 74 रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत तर 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हवेतील गारवा वाढल्याने साथीचे रोग व स्वाईन फ्लू सारखे अजार पुन्हा डोको वर काढत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी तोंडाला बांधून जाणे, भरपूर पाणी पिणे, सर्दी, ताप आल्यानंतर घऱी उपचार न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड माहापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *