ताज़ा खबरे
Home / Raftar News (page 311)

Raftar News

शिवसेनेत खलबते; स्वबळावर सत्ता कशी मिळवायची?

मुंबई: आगामी निवडणुकीत भाजपसोबत जायचे नसेल तर स्वबळावर सत्ता कशी मिळवायची याबाबत मराठवाड्यातील शिवसेनेच्या आमदारांशी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. यावेळी राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्याबाबत मात्र कोणतीही चर्चा झाली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील आमदारांची एक बैठक शिवसेना भवन येथे पार पडली. या भेटीबाबत …

Read More »

कल्याणमध्ये ‘मौत का कुआँ’मध्ये भीषण अपघात; स्टंटमन जखमी

कल्याण: नवरात्रीनिमित्त कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी भरलेल्या जत्रेत ‘मौत का कुआँ’ या खेळात सोमवारी भीषण अपघात घडला. कार स्टंट करणाऱ्या तरुणीचा पाय ग्रीलमध्ये अडकल्यानं ती उलटी लटकली असतानाच, ज्या कारमधून ती बाहेर आली होती, त्याच कारची तिला जोरदार धडक बसली. त्यानंतर ती खाली कोसळली आणि बेशुद्धच पडली. शिवाजी गजभिये असं …

Read More »

भविष्यात भारत हिंदूराष्ट्र होणारच- खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

नगर : ‘राष्ट्रीय अस्मिता समजून घेण्यासाठी प्रत्येकाने भारतीय राज्य घटना अभ्यासली पाहिजे. हिंदू संस्कृतीशी निगडीत तरतुदी घटनेत आहेत. त्यामुळे घटना पूर्ण समजून घेऊन तिची अंमलबजावणी केली तर भारत देश नक्कीच एक दिवस हिंदू राष्ट्र होईल’, असा ठाम विश्वास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मंगळवारी सायंकाळी येथे व्यक्त केला. …

Read More »

पिंपरीतील “अल्फा लावल’ कंपनीला जागतिक पुरस्कार! 

व्यवस्थापकीय संचालक अनंत पद्मनाभन यांची माहिती  पिंपरी- अल्फा लावल कंपनीला जागतिक कंपनी समुहांतर्गत 2015-16 मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला आहे. प्रत्येक वर्षी अल्फा लावल समुह आपल्या विविध उत्पादन केंद्रांच्या कामगिरीचे मूल्यमापन करते. त्यानुसार सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या उत्पादन केंद्राला हा पुरस्कार दिला जातो. उत्पादन प्रक्रियेदरम्यान होणात्या अपघातांमध्ये “एलटीआय’चे (लॉस टाईम इंज्युअरी) …

Read More »

‘वायसीएम’ची स्थिती सुधारण्यासाठी कठोर निर्णय घेणारर: एकनाथ पवार

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावर (वायसीएम) महापालिका कोट्यावधी रुपयांचा खर्च करत आहे. मात्र, त्या तुलनेत रुग्णांना सेवा मिळत नाही. अधिकारी, कर्मचा-यांचे कामावर लक्ष नाही. वायसीएमची स्थिती सुधारण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात येणार आहे, असे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले. तसेच कामचुकारपणा करणा-या कर्मचा-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील …

Read More »

नगरसेवक गायकवाड यांना दिलासा; जातपडताळणी समितीच्या निर्णयास ‘स्थगिती’

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे अनुसूचित जातीचे जातप्रमाणपत्र अवैध ठरविण्याचा निर्णय बुलडाणा जिल्हा जातपडताळणी समितीने दिला आहे. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी (दि.28) स्थगिती दिली आहे. त्यामुळे गायकवाड यांना दिलासा मिळाला असून त्यांचे नगरसेवकपद कायम आहे. महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार …

Read More »

बाहुबली रथाच्या 25 फूटी प्रतिकृतीत विराजमान झाला कसब्याचा राजा

पुणे : आखीव-रेखीव शिल्पे आणि विविधरंगी विद्युतरोषणाईने सजलेल्या बाहुबली रथाची तब्बल 25 फूटी प्रतिकृती कसबा पेठ तांबट आळी माणिक चौकातील जर्नादन पवळे संघाने उभारली आहे. मंडळाच्या 76 व्या वर्षानिमित्त हा वैशिष्टयपूर्ण देखावा साकारण्यात आला असून हा रथ ओढताना गणेशभक्तांना सेल्फी काढता यावा, याकरीता सेल्फी पॉईंटची विशेष सोय करण्यात आली आहे. …

Read More »

गणेशोत्सवात फुलबाजार कडाडला… गुलछडीने मारली बाजी!

पिंपरी: फुलबाजारात गुलछडीने बाजारभावात बाजी मारली आहे. तर झेंडू मागील वर्षीच्या तुलनेत चांगलाच तेजीत आहे. गौरी आगमनाच्या तयारीसाठी नागरिकांनी फुले घेण्यासाठी फुलबाजारात गर्दी केली आहे. आज फुलबाजारात प्रामुख्याने झेंडू, मोगरा, शेवंती, अष्टर, गुलछडी, गुलाब, राजा शेवंती, जुई, काकडा या फुलांची खरेदी प्रामुख्याने केली जाते. सुणासुदीच्या दिवसांमुळे फुलांच्या भावात चांगलीच तेजी आली आहे. झेंडू …

Read More »

पुरुषाला चक्क गर्भाशय ?; पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाचा अजब रिपोर्ट !

पुणे: पुरुषाला गर्भाशय असते का हो ? या प्रश्नाचे उत्तर आता कदाचित ‘हो’ असेच द्यावे लागेल. कारण पोटदुखीवर उपचार घेण्यासाठी गेलेल्या पुण्यातील सागर गायकवाड या तरुणाला प्रसिध्द दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने चक्क गर्भाशय असल्याचा धक्कादायक अहवाल दिला. हा अहवाल पाहून चक्रावलेल्या सागर गायकवाड यांनी थेट फॅमिली डॉक्टरकडे धाव घेतल्यानंतर हा अहवाल …

Read More »

प्रस्तावित रिंगरोड पर्यायी मार्गाने वळवावार; नगरविकास राज्यमंत्र्यांना साकडे!

मुंबई: वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, थेरगाव, पिंपळेगुरव या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातून प्रस्तावित रिंगरोड जाणार आहे. यामुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे हा प्रस्तावित रिंगरोड दाट वस्तीतून न देता पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली. घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने …

Read More »