ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ‘वायसीएम’ची स्थिती सुधारण्यासाठी कठोर निर्णय घेणारर: एकनाथ पवार

‘वायसीएम’ची स्थिती सुधारण्यासाठी कठोर निर्णय घेणारर: एकनाथ पवार

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावर (वायसीएम) महापालिका कोट्यावधी रुपयांचा खर्च करत आहे. मात्र, त्या तुलनेत रुग्णांना सेवा मिळत नाही. अधिकारी, कर्मचा-यांचे कामावर लक्ष नाही. वायसीएमची स्थिती सुधारण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात येणार आहे, असे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले. तसेच कामचुकारपणा करणा-या कर्मचा-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाले आहे. प्रभाग रचना झाली आहे. आता कामचुकारपणा करणा-या कर्मचा-यांची गय केली जाणार नाही, असे सांगत पवार पुढे म्हणाले की, पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाची अवस्था अंत्यत बिकट आहे. या रुग्णालयावर पालिका कोट्यावधी रुपयांचा खर्च करते. या पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे. मात्र, त्या तुलनेत रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. रुग्णांची हेळसांड केली जाते. वायसीएमध्ये नेहमीच औषधांचा तुटवडा असतो. वायसीएमध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

वासयीएम रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचा-यांचे कामावर लक्ष नाही. त्यांना खरेदीत जास्त रस दिसून येतो. अनेक कर्मचारी कामचुकारपणा करतात. त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय सुधारणा होणार नाहीत. येत्या 15 दिवसांत सुधारणा न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पवार यांनी दिला.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *