ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / शिवसेनेत खलबते; स्वबळावर सत्ता कशी मिळवायची?

शिवसेनेत खलबते; स्वबळावर सत्ता कशी मिळवायची?

मुंबई: आगामी निवडणुकीत भाजपसोबत जायचे नसेल तर स्वबळावर सत्ता कशी मिळवायची याबाबत मराठवाड्यातील शिवसेनेच्या आमदारांशी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. यावेळी राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्याबाबत मात्र कोणतीही चर्चा झाली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील आमदारांची एक बैठक शिवसेना भवन येथे पार पडली. या भेटीबाबत सविस्तर माहिती देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले की, सत्तेतून बाहेर पडण्याबाबत कोणतीही चर्चा या बैठकीत झाली नाही. मंत्र्यांबाबतचे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी समजून घेतले. मंत्र्यांनी आमदारांचे प्रश्न जाणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करावा असे आदेश यावेळी उद्धव यांनी दिले.
शिवसेनेत कोणतेही गट नाहीत. एकही आमदार कुठेही जाणार नाही. सर्व आमदार निष्ठावंत आहेत. काहीजणांचे सुपारी घेऊन सेनेची बदनामी करण्याचे काम सुरू आहे, असे कदम म्हणाले. शिवसेनेने जनतेला शब्द दिला आहे.
जनतेसोबत आमची बांधिलकी आहे. जिथे सरकारचे चुकते तेथे बोलणारच, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्वरित थांबायल्या हव्यात, महागाई भडकली आहे, पेट्रोल, सिलिंडरचे भाव वाढत आहेत. त्यामुळेच शिवसेनेला आंदोलन करावे लागत आहे. आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे, पण उद्या जनताही रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे चुकीची माहिती दिली आहे.
शिवसेना भाजपवर व्यक्तिगत टीका करत नसून जनआदोलनांतून जनतेचे प्रश्न मांडत आहे. मात्र भाजप निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांना व्यक्ततिक टार्गेट करीत आहे, असेही कदम म्हणाले. शिवसेनेचे मराठवाड्याचे नाराज आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील बैठकीला हजर होते. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मध्यस्थीने जाधव बैठकीला उपस्थित असल्याचे कळते.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *