ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / कल्याणमध्ये ‘मौत का कुआँ’मध्ये भीषण अपघात; स्टंटमन जखमी

कल्याणमध्ये ‘मौत का कुआँ’मध्ये भीषण अपघात; स्टंटमन जखमी

कल्याण: नवरात्रीनिमित्त कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी भरलेल्या जत्रेत ‘मौत का कुआँ’ या खेळात सोमवारी भीषण अपघात घडला. कार स्टंट करणाऱ्या तरुणीचा पाय ग्रीलमध्ये अडकल्यानं ती उलटी लटकली असतानाच, ज्या कारमधून ती बाहेर आली होती, त्याच कारची तिला जोरदार धडक बसली. त्यानंतर ती खाली कोसळली आणि बेशुद्धच पडली. शिवाजी गजभिये असं या स्टंट गर्लचं नाव असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
‘मौत का कुआँ’ हा खेळ त्याच्या नावाप्रमाणे मृत्यूशीच खेळ आहे. एका विहिरीत प्रचंड वेगात गरगर फिरणाऱ्या बाईक्स, त्याच्या पाठोपाठ फिरणाऱ्या, वर-खाली होणाऱ्या कार, त्या दरम्यान स्टंटमनचे थरारक कवायती हे सगळं पाहताना प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकतो. त्यामुळेच या जीवघेण्या खेळावर बंदी आणण्याची मागणीही अनेकदा झाली आहे. परंतु, हा खेळ अनेकांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे.
दुर्गाडी किल्ल्याजवळ भरणाऱ्या जत्रेत दरवर्षी ‘मौत का कुआँ’चा थरार रंगतो. तरुणाई त्याचा मनसोक्त आनंद लुटते. यंदाही हा खेळ पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत होती. पण, सोमवारी या खेळादरम्यान जे घडलं, ते पाहून सगळेच हादरले.

शिवानी गजभिये ही स्टंट गर्ल आपला साथीदार शादाब आणि कल्पना यांच्यासोबत चारचाकी गाडीतून स्टंट करत होती. विहिरीत कार गरगर फिरत असताना ती ठरल्याप्रमाणे चालत्या गाडीतून बाहेर पडली, पण तिचा पाय ग्रीलमध्ये अडकला. त्यामुळे ती विहिरीच्या भिंतीवर लटकत राहिली. तिला लटकताना पाहून एका दुचाकीस्वारानं मोक्याच्या क्षणी बाईक थोडी खालून नेली, पण त्यापाठोपाठ भरधाव वेगात आलेल्या कारला वेगावर नियंत्रण मिळवता आलं नाही. त्यामुळे या कारची धडक तिला बसली आणि ती खाली कोसळली. खेळ झटक्यात थांबवण्यात आला आणि उपस्थितांनी शिवानीला तातडीने रुग्णालयात नेलं. तिच्या डोक्याला आणि पायांना गंभीर दुखापत झाल्याचं कळतं. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *