ताज़ा खबरे
Home / Raftar News (page 306)

Raftar News

सांस्कृतिक भवनाचे काम रखडले;सत्ताधारी भाजपला डॉ. बाबासाहेबांचा विसर?

पुणे। (पीएनई)- पुणे शहरातील मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असून डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. यासंदर्भात वारंवार आंदोलने करूनही महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना जाग येत नसल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्तेही हतबल झाले आहेत. शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेले …

Read More »

‘पीएमपी’ पास दरवाढीविरोधात आता पुणेकर मैदानात!

पुणे। (पीएनई ) – पीएमपीएमएलमधून पुणेकर मोठ्या संख्येने प्रवास करतात. बस पास हे पीएमपीकरीता आगाऊ मिळणारे उत्पन्न असते. परंतु कोणतीही घोषणा न करता अचानक सर्वच बस पासेस मध्ये वाढ करण्यात आली. यावर कोणचाही अंकुश नाही. पीएमपीच्या पासने प्रवास करणारा प्रवासी हक्काचा असून यामध्ये करण्यात आलेली वाढ जाचक आहे. पीएमपीएलची निकृष्ट …

Read More »

अन्नसुरक्षा हिच जीवन सुरक्षा हे ध्येय हॉटेल व्यावसायिकांनी बाळगावे- पालकमंत्री

पुणे- पुणे विभागातील हॉटेल व्यावसायिकानी त्यांच्या व्यवसायाची वृध्दी करताना अन्न सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आज अन्न व औषधे प्रशासनाच्या वतीने अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम 2006 अंतर्गत सुरक्षित अन्नपदार्थ उत्पादन,साठवण,हाताळणी व विक्रीबाबत हॉटेल,रेस्टॉरन्ट,केटरर्स …

Read More »

महापालिकेच्या मिळकती भाडेतत्वावर देण्यासाठी ‘ई-लिलाव’

पिंपरी- पुणे महापालिकेच्या मालकीच्या मिळकती भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेतील राजकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेप रोखण्याच्या उद्देशाने महापालिकेने पावले उचलण्यास सुरवात केली असून या मिळकतीचा ‘ई-लिलाव’ करण्यात येणार आहे पुणे शहरात महापालिकेच्या मिळकतींची संख्या मोठी असून, त्यात व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या मिळकतींचे प्रमाण अधिक आहे. प्रचलित नियमावलीनुसार ठराविक मुदतीसाठी त्या भाडेतत्त्वावर देण्यात येतात. …

Read More »

पराभवाच्या नैराशातून साठे यांचे माझ्यावर खोटे आरोप – कामठे

पिंपरी- काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे सलग तीन वेळा पराभूत झाले आहेत. याच पराभवाच्या नैराश्यातून त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत असे स्पष्टीकरण नगरसेवक तुषार कामठे यांनी पत्रकारांना दिले. काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांच्या विरुद्ध निवडणुकीसाठी खोटी शैक्षणिक कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करत …

Read More »

‘बीआरटीएस’साठी नगरसेवकांच्या अभ्यासदौ-यावर 50 लाखांचा खर्च!

पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआयटीएस व अन्य प्रकल्पांच्या पाहणीसाठी दोन टप्प्यात एकूण 85 नगरसेवक व 18 अधिकारी अहमदाबाद येथे अभ्यास दौ-यावर जाणार आहे. यावर तब्बल 50 लाख रुपयांचा खर्च होणार असून केवळ विमानप्रवासावरच 10 लाख रुपयांची उधळपट्टी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात बुधवारी (दि.25) 24 नगरसेवक आणि 6 …

Read More »

हजारो दिव्यांनी तीन नोव्हेंबरच्या सायंकाळी लखलखणार लोहगड

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड किल्ल्यावर भव्य दीपोत्सव पिंपरी-  श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड किल्ल्यावर 3 नोव्हेंबरला भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी व मनामनात दुर्गप्रेम जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून …

Read More »

बैलगाडा शर्यत आंदोलन; आमदार महेश लांडगे यांना अटक

– ‘पेटा’ विरोधात राज्यव्यापी एल्गार – चाकणमध्ये केला रास्ता रोको चाकण – राज्यातील बैलगाडा सुरु करण्यासाठी केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, याची काळजी घेण्यासाठी काहीकाळ आमदार लांडगे यांना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. आंदोलक पांगल्यानंतर लांडगे यांची सुटका करण्यात आली. …

Read More »

मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू कोण?; शोध समिती स्थापन

मुंबई : निकाल गोंधळाचा ठपका ठेऊन डॉ. संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर नव्या कुलगुरूंचा शोध सुरू झाला आहे. त्यासाठी राज्यपाल आणि कुलपती विद्यासागर राव यांनी ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन केली आहे. कस्तुरीरंगन हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी प्रमुख …

Read More »

पाऊस जाताच पुण्यात थंडीची चाहुल; तापमान १५.१ वर!

पुणे: परतीच्या पावसाचा राज्यातील मुक्काम संपल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले अन् दुसऱ्याच दिवशी पुणेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव मिळाला. गेल्या दोन दिवसात शहराच्या कमाल तापमानात मोठी घट झाली असून रात्री उशिरा आणि पहाटे हवेत गारवा जाणवतो आहे. शहरात बुधवारी दिवसभरात १५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. या हंगामातील शहरातील …

Read More »