ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / सांस्कृतिक भवनाचे काम रखडले;सत्ताधारी भाजपला डॉ. बाबासाहेबांचा विसर?

सांस्कृतिक भवनाचे काम रखडले;सत्ताधारी भाजपला डॉ. बाबासाहेबांचा विसर?

पुणे। (पीएनई)- पुणे शहरातील मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असून डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. यासंदर्भात वारंवार आंदोलने करूनही महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना जाग येत नसल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्तेही हतबल झाले आहेत.
शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे लहान-मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाचे हक्काचे ठिकाण आहे. वर्षभर आणि विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीदिन आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त या भवनात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, जलसे, अशा नानाविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दुर्मिळ चित्रे आणि महार रेजिमेंटच्या वस्तूंचे संग्रहालय आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाही भवन परिसरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने १ जानेवारीपासून या भवनाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम हाती घेतले होते. त्यामुळे मुख्य सभागृह, संग्रहालय बंद ठेवण्यात आले आहे. परंतु, मार्च महिन्यात आंबेडकर जयंतीदिनापर्यंतही हे काम पूर्ण न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिकेत जोरदार आंदोलन केले.
त्या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी आंबेडकर भवनास भेट देत महिनाभराच्या आत रखडलेले काम पूर्ण करून कार्यक्रमांसाठी मुख्य सभागृह खुले करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतरही काम रखडल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही दिला होता. मात्र, आता महापरिनिर्वाण दिन नजीक आला असतानाही भवनाच्या नूतनीकरणाचे काम अद्याप अपूर्णच असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *