ताज़ा खबरे

महापालिकेच्या मिळकती भाडेतत्वावर देण्यासाठी ‘ई-लिलाव’

पिंपरी- पुणे महापालिकेच्या मालकीच्या मिळकती भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेतील राजकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेप रोखण्याच्या उद्देशाने महापालिकेने पावले उचलण्यास सुरवात केली असून या मिळकतीचा ‘ई-लिलाव’ करण्यात येणार आहे पुणे शहरात महापालिकेच्या मिळकतींची संख्या मोठी असून, त्यात व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या मिळकतींचे प्रमाण अधिक आहे. प्रचलित नियमावलीनुसार ठराविक मुदतीसाठी त्या भाडेतत्त्वावर देण्यात येतात. …

Read More »

पराभवाच्या नैराशातून साठे यांचे माझ्यावर खोटे आरोप – कामठे

पिंपरी- काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे सलग तीन वेळा पराभूत झाले आहेत. याच पराभवाच्या नैराश्यातून त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत असे स्पष्टीकरण नगरसेवक तुषार कामठे यांनी पत्रकारांना दिले. काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांच्या विरुद्ध निवडणुकीसाठी खोटी शैक्षणिक कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करत …

Read More »

‘बीआरटीएस’साठी नगरसेवकांच्या अभ्यासदौ-यावर 50 लाखांचा खर्च!

पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआयटीएस व अन्य प्रकल्पांच्या पाहणीसाठी दोन टप्प्यात एकूण 85 नगरसेवक व 18 अधिकारी अहमदाबाद येथे अभ्यास दौ-यावर जाणार आहे. यावर तब्बल 50 लाख रुपयांचा खर्च होणार असून केवळ विमानप्रवासावरच 10 लाख रुपयांची उधळपट्टी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात बुधवारी (दि.25) 24 नगरसेवक आणि 6 …

Read More »

हजारो दिव्यांनी तीन नोव्हेंबरच्या सायंकाळी लखलखणार लोहगड

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड किल्ल्यावर भव्य दीपोत्सव पिंपरी-  श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड किल्ल्यावर 3 नोव्हेंबरला भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी व मनामनात दुर्गप्रेम जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून …

Read More »

बैलगाडा शर्यत आंदोलन; आमदार महेश लांडगे यांना अटक

– ‘पेटा’ विरोधात राज्यव्यापी एल्गार – चाकणमध्ये केला रास्ता रोको चाकण – राज्यातील बैलगाडा सुरु करण्यासाठी केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, याची काळजी घेण्यासाठी काहीकाळ आमदार लांडगे यांना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. आंदोलक पांगल्यानंतर लांडगे यांची सुटका करण्यात आली. …

Read More »

मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू कोण?; शोध समिती स्थापन

मुंबई : निकाल गोंधळाचा ठपका ठेऊन डॉ. संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर नव्या कुलगुरूंचा शोध सुरू झाला आहे. त्यासाठी राज्यपाल आणि कुलपती विद्यासागर राव यांनी ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन केली आहे. कस्तुरीरंगन हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी प्रमुख …

Read More »

पाऊस जाताच पुण्यात थंडीची चाहुल; तापमान १५.१ वर!

पुणे: परतीच्या पावसाचा राज्यातील मुक्काम संपल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले अन् दुसऱ्याच दिवशी पुणेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव मिळाला. गेल्या दोन दिवसात शहराच्या कमाल तापमानात मोठी घट झाली असून रात्री उशिरा आणि पहाटे हवेत गारवा जाणवतो आहे. शहरात बुधवारी दिवसभरात १५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. या हंगामातील शहरातील …

Read More »

राष्ट्रपतींनी केला टिपू सुलतानचा गौरव; सुब्रमण्यम स्वामींचा विरोधच!

बंगळुरू : कर्नाटकात टिपू सुलतानच्या जयंतीवरून वाद सुरू असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटक विधानसभेत टिपू सुलतानचा गौरव केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. टिपू सुलतान ऐतिहासिक योद्धे होते. इंग्रजांशी लढता लढता त्यांना ऐतिहासिक वीरगती प्राप्त झाली, असा गौरव राष्ट्रपती कोविंद यांनी केला. कर्नाटक विधानसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी हा …

Read More »

बहुप्रतीक्षित पद्मावतीचा ‘घुमर’ प्रदर्शित

मुंबई : संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटातील पहिलं ‘घुमर’ गाणं प्रदर्शित झालंय. या गाण्यात राजस्थानच्या लोककलेतील प्रसिद्ध ‘घुमर’ नृत्य करताना राणी पद्मावती अर्थात दीपिका पादुकोण दिसतेयं. पारंपरिक दागिने, भरजरी राजस्थानी वस्त्र परिधान करून दीपिका या घुमरवर ताल धरताना दिसतेय. राजस्थानमध्ये घुमर नृत्याच्या प्रसिद्ध अभ्यासक ज्योती तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

अनाथांसाठी आमदार महेश लांडगे यांची दिवाळी भेट!

– तब्बल ३२८ विध्यार्थ्यांना चादर वाटप  – ‘डब्ल्यूटीई’ कंपनीचा विधायक उपक्रम पिंपरी– दिपावळीनिमित्त सामाजिक जाणिवेतून आमदार महेश लांडगे आणि ‘डब्ल्यूटीई’ सोशल फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथील मुलांना चादरवाटप करण्यात आले. चिंचवड येथील क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीच्या वतीने २००६ मध्ये पुनरुत्थान समरसता गुरुकुलम सुरू करण्यात आले आहे. या …

Read More »