ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / राष्ट्रपतींनी केला टिपू सुलतानचा गौरव; सुब्रमण्यम स्वामींचा विरोधच!

राष्ट्रपतींनी केला टिपू सुलतानचा गौरव; सुब्रमण्यम स्वामींचा विरोधच!

बंगळुरू : कर्नाटकात टिपू सुलतानच्या जयंतीवरून वाद सुरू असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटक विधानसभेत टिपू सुलतानचा गौरव केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. टिपू सुलतान ऐतिहासिक योद्धे होते. इंग्रजांशी लढता लढता त्यांना ऐतिहासिक वीरगती प्राप्त झाली, असा गौरव राष्ट्रपती कोविंद यांनी केला.
कर्नाटक विधानसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी हा गौरव केला. टिपू सुलतानने मैसूर रॉकेटच्या विकासात मोठं योगदान दिलं आहे. याच रॉकेटचा नंतर युरोपनेही वापर केला होता, असंही राष्ट्रपतिंनी निदर्शनास आणून दिलं. दरम्यान, दुसरीकडे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राष्ट्रपतिंच्या या वक्तव्यानंतरही टिपू सुलतान हे खूनीच होते असं म्हटलंय.
येत्या १० नोव्हेंबर रोजी कर्नाटक काँग्रेसने टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला भाजपने आक्षेप घेतला आहे. काही दिवसापूर्वी टिपू सुलतान ‘बलात्कारी’ आणि ‘खूनी’ असल्याचं विधान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलं होतं. हिंदू स्त्रियांची अब्रू लुटणाऱ्या व्यक्तिची जयंती साजरी करणं लज्जास्पद असल्याचं टि्वटही हेगडे यांनी केलं होतं. हेगडे एवढ्यावरच थांबले नाहीत. तर टिपू सुलतानच्या जयंतीच्या कार्यक्रम पत्रिकेतून आपलं नाव हटविण्यात यावं असंही त्यांनी राज्यसरकारला सांगितलं होतं. त्यामुळे टिपू सुलतानच्या जयंतीवरून वाद उफाळलेला असतानाच राष्ट्रपतिंनी टिपू सुलतानचा गौरव केल्यानं भाजपची कोंडी झाली आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *