ताज़ा खबरे
Home / पुणे / सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांना कानपिचक्या

सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांना कानपिचक्या

पुणे: एखादी वस्तू अथवा कागदपत्रे हरवल्यानंतर नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास जातात. त्या वेळी पोलिस ठाण्यांकडून त्यांना हे काम आमचे नाही, तुम्ही पोलिस आयुक्तालयात जाऊन सायबर शाखेकडे तक्रार करा, अशी टोलवाटोलवी केली जात आहे. अशा घटनांबाबत ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झालेली असताना त्याची माहिती देण्याऐवजी पोलिस ठाण्यांकडून नागरिकांना अंग झटकले जात आहे. त्यामुळे सर्व पोलिस ठाण्यांना अशा घटनांमध्ये योग्य कार्यवाही करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
नागरिकांची कोणतीही वस्तू हरवल्यास ते जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जातात. यातील बहुतांश तक्रारी मोबाइल, शैक्षणिक कागदपत्रे, पाकीट, लायसन्स, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड यांच्या असतात. महत्त्वाचा सरकारी दस्तावेज हरवल्यास त्याचा इतरांकडून दुरूपयोग होऊ शकतो. त्यामुळे त्याची पोलिसांकडे हरवले आहे (मिसिंग) अशी तक्रार दाखल केली जाते. पुणे शहरात दररोज शेकडो तक्रारी दाखल होत होत्या. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा बराच वेळ जात होता आणि नारिकांना पोलिस ठाण्यात जावे लागत होते. हा त्रास कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘लॉस्ट अँड फाउंड’ हे नवे पोर्टल सुरू केले आहे. त्यामध्ये ऑनलाइन तक्रार नोंदविता येते. त्यांना आवश्यक असलेले प्रमाणपत्र पोलिसांकडून ऑनलाइन मिळते. शहरात वस्तू अथवा मोबाइल हरवल्याची तक्रार देण्यासाठी नागरिकांना स्थानिक पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा वाईट अनुभव येत आहे.
मोबाइल हरविल्याची तक्रार घेतल्यांनतर त्याचा शोध घेण्यासाठी तो ट्रेसिंगला टाकाणे, याबाबत माहिती ब्रॉडकास्ट करून इतर पोलिस ठाण्यांना निरोप देणे आवश्यक आहे. मात्र, पोलिस ठाण्यांमध्ये मोबाइल हरवल्याची तक्रार घेण्याऐवजी त्यांना पोलिस आयुक्तालयातील सायबर शाखेत जाऊन तक्रार द्या, ते काम तेथून चालते. येथे केले जात नाही असे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. याची दखल घेऊन सर्व पोलिस ठाण्यांना पोलिस आयुक्तालयाकडून याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्यापही अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Check Also

पुणे में सीबीआई ने मणिपुर हत्याकांड के मास्टरमाइंड को दबोचा

पुणे- मणिपुर में पिछले कुछ महीनों से हिंसा जारी है। दो बच्चों का अपहरण कर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *