ताज़ा खबरे
Home / मनोरंजन / ‘सैराट’च्या हिंदी रिमेकचे पोस्टर ‘धडक’ले!

‘सैराट’च्या हिंदी रिमेकचे पोस्टर ‘धडक’ले!

मुंबई। मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी आर्ची आणि परशाची ‘सैराट’ प्रेमकथा आता प्रेक्षकांना हिंदीत पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शक करण जोहर ‘सैराट’चा हिंदी रिमेक करणार असून ‘धडक’ असं नाव या चित्रपटाला देण्यात आलं आहे. ‘धर्मा प्रॉडक्शन्स’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ‘धडक’चा फर्स्ट लूक नुकताच शेअर करण्यात आला आहे.
प्रेक्षकांना सुरुवातीला खळखळून हसायला लावणारा, ‘झिंगाट’वर ताल धरायला लावणारा ‘सैराट’चा शेवट मात्र मनाला चटका लावून जातो. विशेष म्हणजे नागराज मंजुळेच्या मूळ चित्रपटातील हा शेवट बदलला नसल्याचे जणू संकेतच करणनं या पोस्टरमधून दिले आहेत. पोस्टरवरील ‘धडक’ या नावावर उडालेले रक्ताचे शिंतोडे पाहून मराठी ‘सैराट’ पाहिलेल्या अनेकांना याची कल्पना येऊ शकते.

Check Also

अभिनेता सुशांत सिंह राजपुत फांसी लगाकर आत्महत्या की

मुंबई- बॉलीवुड से एक बहुत ही चौंकाने वाली खबर सामने आई है। मशहूर एक्टर सुशांत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *