ताज़ा खबरे
Home / पुणे / पीएमपी बस पास दरवाढी विरोधात पुणेकरांची स्वाक्षरी मोहीम

पीएमपी बस पास दरवाढी विरोधात पुणेकरांची स्वाक्षरी मोहीम

पुणे। पीएमपीची निकृष्ट सेवा आणि बस पास दरवाढीला विरोध करण्यासाठी पीएमपी प्रवासी मंचतर्फे शिवाजीनगर आणि सिमला आॅफिस बसस्थानकावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. प्रवाशांनी मोठ्या संख्येने स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला.
यावेळी प्रवासी मंचाचे जुगल राठी, जयदीप साठे, विपुल पाटील, सतीश चितळे, आशा शिंदे, इम्रान मणेर, साजिद शेख उपस्थित होते. यावेळी ६०० पेक्षा जास्त नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला.
जुगल राठी म्हणाले, ” पीएमपीकडून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर बस पास मध्ये अनावश्यक बेकायदा दरवाढ करण्यात आली आहे. या बसपास दरवाढीला विरोध करण्यासाठी शहरातील विविध भागात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे”

Check Also

पुणे में सीबीआई ने मणिपुर हत्याकांड के मास्टरमाइंड को दबोचा

पुणे- मणिपुर में पिछले कुछ महीनों से हिंसा जारी है। दो बच्चों का अपहरण कर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *