ताज़ा खबरे
Home / मनोरंजन / ‘गोलमाल’ सुसाट ; १५०कोटींची केली कमाई

‘गोलमाल’ सुसाट ; १५०कोटींची केली कमाई

मुंबई। रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल अगेन’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसतोय. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं अवघ्या नऊ दिवसांत तब्बल १५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
दोन वर्षात गोलमालची सिरीज आणणाऱ्या रोहित शेट्टीने या सिनेमासाठी ७ वर्षाचा वेळ घेतला आहे. यासिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका करत ३० कोटी रुपयांचा गल्ला जमविला होता तसेच दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने साधारणपणे २८.३७ कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवढ्यातही सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्सऑफिसइंडिया डॉट कॉमनुसार आत्तापर्यंत सिनेमाच्या एकूण कमाईचा आकडा १५३.९५ कोटींवर पोहचला आहे.

Check Also

अभिनेता सुशांत सिंह राजपुत फांसी लगाकर आत्महत्या की

मुंबई- बॉलीवुड से एक बहुत ही चौंकाने वाली खबर सामने आई है। मशहूर एक्टर सुशांत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *