ताज़ा खबरे
Home / मनोरंजन / ‘क्लायमॅक्स उघड करू नका’ : अमिताभ बच्चन

‘क्लायमॅक्स उघड करू नका’ : अमिताभ बच्चन

मुंबई। चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाची कथा किंवा चित्रपटातील महत्त्वाची दृश्य व्हायरल होण्याचं प्रमाण वाढलं असल्यानं महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांना चित्रपटाबद्दल सस्पेन्स बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘इत्तेफाक’चा ट्रेलर शेअर केला असून त्याच्या सोबतच ‘चित्रपटाच्या कथेबाबत गुप्तता बाळगा व चित्रपटाचा शेवट म्हणजेच क्लायमॅक्स उघड करू नका’ अशी विनंती केली आहे. या चित्रपटात अमिताभ यांच्या नमक हलाल चित्रपटातील ‘रात बाकी…बात बाकी’ हे गाणं नव्यानं चित्रीत करण्यात आलं आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय खन्ना यांची भूमिका असलेल्या ‘इत्तेफाक’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला आहे. एका अनोख्या पद्धतीनं हा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. हा ट्रेलर रिलीज होत असताना चित्रपटातील एकही कलाकार उपस्थित नव्हता. चित्रपटाबद्दलची माहिती बाहेर जाऊ नये या उद्देशानं केवळ निर्मात्यांच्या उपस्थितीतीत हा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

Check Also

अभिनेता सुशांत सिंह राजपुत फांसी लगाकर आत्महत्या की

मुंबई- बॉलीवुड से एक बहुत ही चौंकाने वाली खबर सामने आई है। मशहूर एक्टर सुशांत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *