ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / पाणीकपात कराल तर याद राखा.. ! पाणी कपातीच्या निषेधार्थ शिवसेनेचे हंडा आंदोलन

पाणीकपात कराल तर याद राखा.. ! पाणी कपातीच्या निषेधार्थ शिवसेनेचे हंडा आंदोलन

पुणे: जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेच्या पाणी वापरात साडेसहा टीएमसी पाणीकपात करावी असा आदेश दिल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने महापालिकेसमोर हंडा आंदोलन केले. पाणीकपात कराल तर याद राखा.. ! असा इशारा शिवसेनेने दिला.
शासनाने पुणे महापालिकेला 2021 पर्यंत वार्षिक 11.50 टीएमसी पाणी मंजूर केले आहे. त्यानुसार शहराची आजची लोकसंख्या 39.18 लाख गृहित धरून महापालिकेला वार्षिक 8.19 टीएमसीपर्यंत पाणीपुरवठा करण्याचा आदेश प्राथमिक विवाद निवारण अधिकारी तथा जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांनी दिला आहे. या निर्णया विरोधात शिवसेनेने महापालिकेसमोर हंडा आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध केला.

Check Also

महाराष्ट्र भाजपा के 23 प्रत्याशियों का ऐलान,5 सांसदों का पत्ता कटा

मुंबई-महाराष्ट्र में 19 अप्रैल से 20 मई तक पांच चरणों में लोकसभा चुनाव होंगे। बीजेपी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *